Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बऱ्याचदा आपण 'आई' या नात्याविषयी बऱ्याच गोष्टी एकतो. आई सारख प्रेम संपूर्ण जगात कोणीच करू शकत नाही अस ही आपण बऱ्याचदा ऐकल असेलच.पण आताच्या कलियुगाच्या जगात आईच नात ही कमकुवत झालेले पहायला मिळत आहे. अलीकडेच, हंगरी (hungary) मधील एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे जिथे 44 वर्षीय कॅटलिन एर्झबेट ब्रॅडॅक्सला (Katalin Erzsebet Bradacs) तिच्या 2 वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, या महिलेने आपल्या मुलाला कसायाप्रमाणे चाकूने मारले आणि त्याचे रक्ताने माखलेले शरीर सोडून पळून गेली. ( Sex Racket: महिलांसोबत घाणेरडे कृत्य करण्यासाठी व्यक्तीचे 75 महिलांशी लग्न, 200 तरुणींना देह विक्री व्यापारात ढकल्यानंतर पोलिसांनी केला मोठे खुलासे)

केटलिन एर्झबेट ब्रॅडॅक ही एक माजी पोर्न अभिनेत्री आहे जिला अलीकडेच तिच्या 2 वर्षांचा मुलगा एलेक्स जुहाज़ (Alex Juhasz) याच्या हत्येसाठी अटक करण्यात आली आहे.असे सांगितले जात आहे की, ही आई 1 ऑक्टोबर दुपारी उंब्रियाच्या मध्य इटालियन प्रदेशातील Cittadella Pieve या छोट्या शहराच्या लिडल सुपरमार्केटमध्ये आली आणि तिच्या मुलाचा मृतदेह लिडलमधील चेकआऊट काउंटरच्या वर विकृत अवस्थेत सोडून पळून गेली. त्या 2 वर्षांच्या मुलाच्या शरीरावर, छातीवर आणि मानेवर 9 वेळा वार करण्यात आले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना महिलेच्या हँडबॅगमध्ये चाकू सापडला, त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की, गुन्ह्याचा हेतू मुलाच्या वडिलांचा बदला घेणे होता ज्यांच्यापासून ती अलीकडेच विभक्त झाली होती आणि मुलाच्या ताब्यासाठी दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलाच्या आईशिवाय पोलिसांना घटनास्थळी कोणताही संशयित दिसला नाही. प्रत्यक्ष गुन्हा कॅमेऱ्यात पकडला गेला नसला तरी, माजी पॉर्न अभिनेत्री घटनास्थळी पोहोचली आणि मुलाला सोडताना दिसली आहे.