ह्यूमन ट्रॅफिकिंग (Human Trafficking)आणि सेक्स रॅकेटशी (Sex Racket) संबंधित अनेक बातम्या देशाच्या विविध भागातून वारंवार येत आहेत. याच संदर्भात एका व्यक्तीला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. ज्याने महिलांसोबत घाणेरडे काम करण्यासाठी 75 विवाह केले होते आणि 200 तरुण मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले होते. मध्य प्रदेशच्या इंदूर पोलिसांनी मुनीर नावाच्या आरोपीला सुरत येथून अटक केली असून त्याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. चौकशी दरम्यान आरोपीने प्रथम कबूल केले की, बांग्लादेशी मुली आणि महिला त्याचे लक्ष्य होते. 5 वर्षांपूर्वी वेश्या व्यवसायात आल्यानंतर तो दरमहा सुमारे 55 मुलींना आपले लक्ष बनवत असे. (Porn Films: पहिल्या नजरेत प्रेम; लग्नानंतर पतीसमोर आले धक्कादायक सत्य, पत्नी होती पॉर्न स्टार, ठेवले आहेत अनेक पुरुषांशी संबंध)
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीने आतापर्यंत 200 हून अधिक बांग्लादेशी मुलींना भारतात आणले आहे. तसेच त्यांना लैंगिक संबंधाच्या व्यवसायात ढकलले आहे. असे म्हटले जाते की, बांग्लादेशाच्या जसोर येथील मुनीरने बहुतेक मुलींशी लग्न केले आणि नंतर त्यांना भारतात आणून विकले. या व्यवसायात कोणतीही अडचण नव्हती, म्हणून त्याने 75 मुलींशी एक एक करुन लग्नही केले. तर बांग्लादेशी चे एजंट गरीब कुटुंबातील मुलींना नोकरीच्या बहाण्याने गुप्तपणे सीमा ओलांडून कोलकाता येथे आणायचे. जिथे मुलींना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवले जायचे. या काळात त्यांना देहबोली आणि जीवनशैली सुधारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. जेव्हा त्या प्रशिक्षित होयच्या तेव्हा त्यांने मुंबईला पाठवण्यात आले. तेथे पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले. मग मागणीनुसार मुलींना उत्तर भारतीय शहरांमध्ये पाठवण्यात आले.
दरम्यान, इंदूर पोलिसांनी 11 महिन्यांपूर्वी एक ऑपरेशन चालवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. 11 बांग्लादेशी मुलींसह सुमारे 21 मुलींची सुटका केली होती. सेक्स रॅकेटच्या या प्रकरणात सागर उर्फ सांडो, आफरीन, आमरीन आणि इतरांना आरोपी बनवण्यात आले होते. परंतु मुनीर नावाचा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला, ज्याला इंदूर पोलिसांनी सूरत येथून अटक केली.