सध्याच्या जनरेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला भेटणे... पहिल्या नजरेत प्रेम होणे... आणि लगेच लग्न करणे, अशा गोष्टी फार कॉमन झाल्या आहेत. मात्र कधी कधी आपल्याला आपल्याच निर्णयावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. अलीकडेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्रिटनमधील (Britain) एक 26 वर्षीय व्यक्ती पहिल्याच नजरेत एका मुलीच्या प्रेमात पडला. हे प्रेम हळूहळू फुलले आणि दोघांनी नंतर लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतर पत्नीचे एक धक्कादायक गुपित त्याच्या समोर आले, जे पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
डेलीमेलच्या अहवालानुसार, 26 वर्षीय जोशुआ क्रिस्टीने (Joshua Christie) 34 वर्षीय एमी क्रिस्टोफर्सशी (Amy Christophers) लग्न केले. दोघांचा छान संसार सुरु होता, मात्र एक दिवस अचानक जोशला कळले की त्याची पत्नी एमी पूर्वी प्रसिद्ध पोर्न (Porn Star) स्टार होती. अशा चित्रपटांच्यादरम्यान तिने अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले होते. एमीचा भूतकाळ समोर आल्यानंतर जोशला मोठा धक्का बसला. त्याच्या एका मित्राचे म्हणणे आहे की, जोशला आता खेद आहे की त्याने लग्नाआधी एमीची पार्श्वभुमी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही.
अहवालानुसार, एमीने वयाच्या 25 व्या वर्षी प्रथमच पोर्न चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने Brandy Brewer या टोपण नावाने या जगात पाऊल ठेवले. एक कलाकार म्हणून एमीने अनेक एक्स-रेटेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर तिला नेहमी भीती वाटायची की, जोशला तिच्याबद्दल कळले तर काय होईल? एमीचा मित्र म्हणतो की, एकेकाळी ती प्रौढ चित्रपटांमध्ये काम करायची, पण हा फक्त तिचा भूतकाळ आहे. (हेही वाचा: Car Sex By Police Officers: ड्युटीवर असताना कारमध्ये सेक्स करण्यात गुंतलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आपत्कालीन कॉलकडे केले दुर्लक्ष)
हे कटू सत्य समोर आल्यापासून जोश आणि एमीच्या नात्यामध्ये थोडा दुरावा आला आहे. बऱ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत. महत्वाचे म्हणजे जोशला देखील वाटते की हा त्याच्या पत्नीचा भूतकाळ आहे मात्र हे जोडपे घटस्फोट घ्यायचा का नाही याबाबत विचार करत आहे.