तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून तिथल्या लोकांमध्ये तसेच नेत्यांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नेते काबूल सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत. या मध्ये अफगाणिस्तानचे माजी मंत्री सय्यद सादत यांचाही समावेश आहे. अहमद शाह सादत हे सध्या जर्मनीत आश्रय घेत आहेत. अहमद यांनी जर्मनीत राहण्याची व्यवस्था केली पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना काहीतरी काम करणे भाग आहे त्यामुळे ते सध्या असे काही काम करत आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. येथे उपजीविकेसाठी ते पिझ्झा डीलीवरी करत आहेत. अफगाणिस्ताचे माजी संचार मंत्री असलेल्या सय्यद अहमद शाह सादत यांनी तालिबानच्या ताब्यात आल्यानंतरच अफगाणिस्तान सोडले. (Belgium: Chimpanzee शी सोबत अफेअर असल्याचे समजताच महिलेला प्राणिसंग्रहालयात येण्यास बंदी )
मीडिया रिपोर्टनुसार, ते सध्या जर्मनीमध्ये आहे आणि त्यांचे काही फोटोही समोर येत आहेत. ट्विट केलेल्या फोटोंमध्ये, तुम्ही पाहू शकता की अफगाणिस्तानचे माजी मंत्री अहमद शाह जर्मनीमध्ये पिझ्झा देत आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांना सायकलवर पिझ्झा देणे भाग पडले आहे.
A former minister in #Afghanistan is working as a pizza delivery person in Germany. The photos of Syed Ahmad Shah Sadat, who worked as communications and technology minister in Afghanistan, were posted by Al-Jazeera Arabia on Twitter. pic.twitter.com/oK31QYmtNM
— The Daily Wattan (@DailyWattan) August 25, 2021
मीडिया रिपोर्टनुसार, सईद लीपझिग शहरात सायकलवरून पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तथापि, असेही सांगितले जात आहे की, तालिबानच्या ताब्यात येण्यापूर्वीच सईद यांनी वर्ष 2020 मध्येच मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती अशरफ घनी आधीच अफगाणिस्तान सोडून पळून गेले आहेत. ते सध्या यूएईमध्ये आहेत. अलीकडेच यूएईनेच याची पुष्टी केली आणि असे म्हटले गेले की, त्यांना मानवतावादी कारणास्तव आश्रय देण्यात आला आहे.