Fact Check: लॉकडाऊन काळात मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी वाईन शॉप्स खुली राहणार? व्हायरल होणाऱ्या या पोस्टमागील नेमके सत्य काय?
Fake Message Going Viral on Social Media (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) दहशतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश 21 दिवस लॉकडाऊन (Lockdown) असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक फेक मेसेजेस सोशल मीडियावर फिरु लागले. अलिकडेच महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा फोटोसह एक मेसेज व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आणि इन्टाग्रामवर देखील व्हायरल होत आहे. या फोटोत लॉकडाऊनच्या काळात वाईन शॉप (Wine Shops) खुली राहणार असे सांगितले जात आहे. या पोस्टमध्ये दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान महाराष्ट्रातील् वाईन शॉप्स खुली राहतील असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात मराठी वृत्तवाहिनीचा लोगोही वापरण्यात आला आहे.

ही निव्वळ अफवा असून यात कोणतेही तथ्य नाही. अफवा पसरवणाऱ्यांचे हे काम आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. तसंच वाईन किंवा मद्य ही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे या फिरणाऱ्या मेसेजमध्ये काही तथ्य नाही. हा मेसेज फेक आहे. फोटोशॉप करुन हा फोटो वापरण्यात आला आहे.  (पुढील 10 दिवसांसाठी भारतात इंटरनेट सेवा बंद राहणार? WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमागील नेमके सत्य काय? जाणून घ्या)

पहा पोस्ट:

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किराणा दुकाने, मेडिकल स्टोर्स खुली राहणार आहेत. त्याचबरोबर दूध, भाजीपाला या गोष्टीही उपलब्ध असतील. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 135 झाला असून सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसंच फेक न्यूजमुळे गोंधळ उडू नये म्हणून त्याची सत्यता तपासणेही आवश्यक आहे.