Fact Check: नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कपात? PIB ने सांगितले सत्य
Fake News (Photo Credits: PIB)

सोशल मीडिया एक बातमी जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. यात नववर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) पगारात कपात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कामगार कायद्यात बदल केल्याने पुढील वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची पगार कपात होणार आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ही बातमी ट्विटरवर शेअर करत यामागील सत्य सांगतिले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अशा अनेक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. कोविड-19 (Covid-19) संकटात तर फेक बातम्यांचे प्रस्थ अधिकच वाढले.

ट्विटच्या माध्यमातून पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये पीआयबीने लिहिले की, "हा दावा खोटा आहे. वेतन विधेयक, 2019 केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना लागू होणार नाही." त्यामुळे या बातमीमध्ये करण्यात आलेला दावा अत्यंत चुकीचा आहे. (Fact Check: Ration Card 3 महिन्यापर्यंत न वापरल्यास रद्द होणार? PIB ने सांगितले व्हायरल मेसेज मागील सत्य)

व्हायरल बातमीतील दावा: कामगार कायद्यात बदल झाल्याने पुढील वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार.

पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा फेक आहे. वेतन विधेयक, 2019 केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना लागू होणार नाही.

Fact Check By PIB:

अशा प्रकराच्या अनेक फेक बातम्या, दावे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्याची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येते. त्याचबरोबर पीआयबी फॅक्ट चेक वारंवार या व्हायरल बातम्यांमागील सत्यता तपासून नागरिकांना सतर्क करत असतं. दरम्यान, व्हायरल बातम्यांमागील सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.