कोरोना व्हायरसचा विळखा जगातील अनेक देशांना बसला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे याबद्दल अनेक खोट्या बातम्या, अफवा यांचे पेव फुटले आहे. फेक न्युज आणि अफवा यामुळे आधीच अस्वस्थ असलेले नागरिक अधिकच पॅनिक होत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून रस्त्यावर 800 वाघ आणि सिंह सोडले आहेत, अशी बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होती. (Fact Check: टाळ्या वाजवल्याने कोरोनाचे विषाणू मरतात; काय आहे या मागील सत्य? जाणून घ्या)
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून रशियामध्ये आतापर्यंत 306 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि घरातच सुरक्षित राहणे यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रस्त्यावर तब्बल 800 वाघ आणि सिंह सोडले आहेत, असे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिले होते.
Twitter Post:
तसंच रशियाच्या अध्यक्षांनी नागरिकांपुढे दोन पर्याय ठेवले होते. दोन आठवड्यांसाठी घरात रहा किंवा 5 वर्षांसाठी जेलमध्ये जा. यामध्ये कोणताही मधला मार्ग नव्हता. त्यामुळे नागरिकांनी घरातच रहावे, म्हणून रस्त्यावर सिंह आणि वाघ सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Twitter Post:
Vladimir Putin has given Russians two options
You stay at home for 2 weeks or you go to jail for 5years
No middle ground
RUSSIA Vladimir Putin has Dropped 800 tigers and Lions all over the Country to push people to stay Home.. Stay Safe Everyone! pic.twitter.com/41KOjl8vNe
— Mohammad Ahmed (@MohammadAhmedDh) March 22, 2020
मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटोज 2016 मधील असून डेलीमेलने ते पोस्ट केले होते. त्यामुळे रशियाच्या अध्यक्षांनी रस्त्यावर वाघ किंवा सिंह सोडल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो हे साऊथ आफ्रीकेतील असून 2016 चे आहेत.