Fact Check: टाळ्या वाजवल्याने कोरोनाचे विषाणू मरतात; काय आहे या मागील सत्य? जाणून घ्या
PIB Fact Check (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा विळखा वाढू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 मार्च) दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान या कर्फ्युमध्ये नागरिकांनी संध्याकाळी 5 वाजता टाळ्या, शंख, घंटा नाद नाद करण्याचेही आवाहन केले आहे. मात्र यामधूनच सोशल मीडियामध्ये काही अफवा पसरल्या आहेत. टाळ्या वाजवल्यामुळे कोरोना विषाणू मरण पावतात, अशी अफवा सध्या जोरदार पसरली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवायला सांगितल्या असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यात नेमकी सत्यता किती हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. (Coronavirus Impact: कोरोना व्हायरसच्या भीतीने प्राध्यापकाने उत्तर पत्रिका केल्या मायक्रोवेव्हमध्ये गरम; विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत जाळून खाक)

टाळ्या वाजवल्यामुळे कोरोना विषाणू मरण पावतात ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. टाळ्या वाजवल्यामुळे कोरोनाचे विषाणू मरत नाहीत. तसंच टाळ्यांमधून निर्माण होणाऱ्या स्पंदनातूनही कोरोना विषाणूंवर काहीही परिणाम होत नाही. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही आपल्याला सेवा पुरवणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले आहे.

PIB Fact Check Tweet:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अफवांचेही पेव फुटले आहे. मात्र कोणत्याही गोष्टीची सतत्या तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. त्यामुळे आपलाच अधिक गोंधळ उडू शकतो. तसंच अफवांना चाप बसवण्यासाठी अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिस कठोर कारवाई करत आहेत.