एप्रिल फूल (April Fool's Day) विनोदांच्या नावाखाली सोशल मीडियावर या वेळी देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती राजवट आणि इतर काही घटक चांगलेच केंद्रस्थानी आले आहेत. एक एप्रिलचे निमित्त साधत सोशल मीडियावर नेटीझन्स आणि ट्रोलर्सनी जुन्या आठवणींना उजाळा देत जोरदार टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू? (Presidential Rule in Maharashtra), देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ?, यांसह अशाच काही जुन्या वृत्ताचे व्हिडिओ शेअर करत एप्रिल फूल (April Fools' Day 2021 Joke) केले जात आहे. अर्थात हे सर्व मेसेज व्हायरल झाले असले तरी त्याचा आणि वास्तवतेचा काहीच संबध नाही. या सगळ्या भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. राज्यात ना राष्ट्रपती राजवट लागू आहे ना मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती प्रचंड बहुमताने निवडूण आली. परंतू, मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षाचे बिनसले आणि सत्तास्थापनेचा पाळणा लांबला. कोणत्याच पक्षाने सत्तास्थापनेसाठी दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. हे सगळे घडत असतानच अचानक एक दिवशी बातमी धडकली. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री. बातमी खरी होती. रातोरात राष्ट्रपती राजवट हटली होती. पहाटे पहाटे राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. (हेही वाचा, April Fool’s Day 2021: Mumbai Police नी देखील एप्रिल फूल डे चं औचित्य साधत विना मास्क फिरणार्यांसाठी शेअर केली पोस्ट)
Is this true - #MaharashtraGovernment ? pic.twitter.com/L3bOaVMyyp
— Non-Corrupted Indian (NCIP) (@BeastSl51427506) April 1, 2021
Big Breaking.. महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगा #MaharashtraGovernment
— 𝗩𝗶𝗻𝗮𝘆 𝗞𝘂𝗺𝗮𝗿 𝗔𝗴𝗿𝗮𝗵𝗮𝗿𝗶 (@vinaykragrahari) April 1, 2021
Is this true - #MaharashtraGovernment ? pic.twitter.com/L3bOaVMyyp
— Non-Corrupted Indian (NCIP) (@BeastSl51427506) April 1, 2021
आज एक एप्रिल. एप्रिल फूलचा दिवस. एप्रिल फूलचे निमित्त साधत नेटकऱ्यांना जुन्या आठवणी पुन्हा नव्याने शेअर केल्या आहेत. यात 'तो पुन्हा आला', महाराष्ट्रात राष्टपती राजवट लागू?, देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ? यांसह इतरही काही संदेश पाहायला मिळतात. यातील कोणत्याच संदेशात तथ्य आढळत नाही.