Fact Check (Photo Credits: PIB)

Fact Check:  सोशल मीडियात सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये येत्या 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा बंद राहणार असल्याचा दावा केला गेला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. तर नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळा 30 नोव्हेंबर पर्यंत बंदच राहणार असल्याचा दावा पोस्टमध्ये केला गेला आहे. मात्र PIB यांनी या व्हायरल झालेल्या पोस्टमागील सत्यता समोर आणली आहे.

PIB यांनी असे म्हटले की, एका खोट्या नोटीसमध्ये दावा करण्यात आला आहे की 20 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच महाविद्यालये ही बंद राहणार आहेत. PIB गृहमंत्रलयाने दावा केला की, या खोट्या नोटीस पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तर शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु करण्याचा निर्णय MHA यांनी सप्टेंबर महिन्यातच जाहीर केला होता. त्यानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सोडून हा निर्णय घेतला होता.(Fact Check: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळेस आकारले जाणार 100 रुपये? जाणून घ्या सत्य)

पीआयबी यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या व्हायरल पोस्ट मागील सत्य समोर आणले आहे. पोस्टच्या हेडलाइनमध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यावर पीआयबी यांनी फॅक्ट चेक करत ती हेडलाइन दिशाभुल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑक्टोंबर महिन्यात शिक्षण मंत्रालयाने अनलॉक 5 नुसार 15 ऑक्टोंबर नंतर शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या. त्यानुसार, शाळा आणि कोचिंग संस्था 15 ऑक्टोंबर नंतर नियम आणि अटींनुसार सुरु करु करता येणार असल्याचे स्पष्ट केले होते. शाळा आणि महाविद्यालये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सुरु करण्याचा स्वर्वसी निर्णय स्थानिक सरकावर सोपण्यात आला आहे.