Fact Check: February 2022 मध्ये प्रत्येक दिवस 4-4 दिवस येणार हा खरंच 823 दिवसांनी येणारा योगायोग? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य!
खोटी वायरल पोस्ट । File Photo

दरवर्षी फेब्रुवारी (February) महिना आला की एक मेसेज सोशल मीडीयामध्ये वायरल होतो तो म्हणजे या महिन्यात प्रत्येक दिवस 4 वेळेस येणार आहे. हा योग 823 वर्षांनी येतो. दरम्यान खरंच फेब्रुवारी 2022 हे लाईफटाईम स्पेशल वर्ष असून यंदा 823 वर्षांनी काही खास योगायोग जुळून येणार आहे?

फेब्रुवारी महिन्यात लीप इयर वगळता दरवर्षी 28 दिवस असतात. लीप इयर जे दर 4 वर्षांनी येते त्यावेळेस 29 दिवस असतात. त्यामुळे दरवर्षी सात दिवसांच्या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवस चार दिवस येतोच. त्यामुळे यंदा फेब्रुवारी 2022 देखील 28 दिवसांचा असल्याने यामध्ये प्रत्येक दिवस 4 वेळा येणार आहे. तुम्ही अगदी कॅलेंडर पाहून देखील व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेला मेसेज खोटा असल्याचं सहज समजू शकता.

लीप इयर मध्ये 29 दिवस असतात. त्यामुळे लीप इयरच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आठवड्यातील एक दिवस 5 वेळा येतो. बाकी सारे दिवस 4-4 वेळेसच येतात. नक्की वाचा: Fact Check: देशात 25 जानेवारीपर्यंत Lockdown जाहीर केल्याची Fake News व्हायरल; जाणून घ्या सत्य .

सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या मेसेज मध्ये 823 वर्षांच्या योगायोगाबाबत सांगायचे झाल्यास त्यामध्ये तथ्य नाही. लीप इयर सोडलं तर फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक दिवस हा 4-4 वेळेसच येणार. त्यामुळे वायरल मेसेजमधील दावा खोटा आहे. यंदा कोणताही योगायोग नाही.