PM Modi Lauds 4-year-old Mizoram Girl (Photo Credits: PTI and Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 4 वर्षीय एका चिमुकलीच्या 'वंदे मातरम' गाण्याचं कौतुक केले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून तिच्या प्रयत्नांना "adorable and admirable" म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियामध्येही या चिमुकलीच्या वंदे मातरमची धूम आहे. 4 वर्षीय इस्टर हनामते ( Esther Hnamte) ही मिझोरमची रहिवासी आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी ट्वीटर वर ' मां तुझे सलाम, वंदे मातरम' हे इस्टर हनामते चं गाण्याचं व्हर्जन शेअर केलं आहे.

मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी इस्टर हनामते चं कौतुक करताना मिझोरमच्या लुंगलेई (Lunglei)ची चिमुकली 'मा तुझे सलाम वंदे मातरत' गाण्याचा Mesmerizing क्षण. म्हणत तिचं कौतुक केले आहे.

इथे पहा Esther Hnamte चा वंदे मातरम गातानाचा गोड व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मुख्यमंत्री जोरामथंगा यांचा व्हिडिओ रिट्विट करत Esther Hnamte चं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. दरम्यान ट्वीटरवर नेटकर्‍यांनी देखील तिचं तोंडभरून कौतुक केले आहे. या 4 वर्षीय चिमुकलीचा व्हिडिओ पाहून काहींनी संगीतकार, गायकांना हनामतेच्या टॅलंटला प्रमोट करण्याची रिक्वेस्ट केली आहे. काहींनी हनामतेचा इनबॉर्न सिंगर म्हणून उल्लेख केला आहे. तर काहींनी भावी आयुष्यात यशाचं शिखर गाठण्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.