Man Slapped Mother:  मुलाची कानाखाली वर्मी लागली, आईचा जागीच मृत्यू (Video)
Man Slapped Mother | (Photo Credits: Twitter)

पोटच्या मुलाने मारलेली कानाखाली वर्मी लागल्याने जन्मदात्या आईचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना राजधानी दिल्ली (Delhi) येथील द्वारका (Dwarka) परिसरात घडली. या घटनेतील मुलाचे वय 45 तर आईचे वय 76 वर्षे इतके आहे. अवतार कौर (Avtar Kaur) असे या महिलेचे तर रणबीर अवतार असे मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV ) मध्ये कैद झाली आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, अवतार कौर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अवतार कौर आणि त्यांचे शाजारी यांच्यात पार्किंगच्या कारणावरुन वाद झाला होता. या वादातून शेजाऱ्यांनी पोलिसांत माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हा वाद मिटवला होता.

दरम्यान, शेजाऱ्यांसोबतचा पार्किंगचा वाद मिटल्यानंतर अवतार यांचा मुलगा रणबीर घरी आला. त्याने आईला झालेल्या भांडणाबाबत जाब विचारला. या वेळी मुलगा आणि आई यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यातून राग अनावर झाल्याने रणबीरने आईच्या कानशिलात लगावली. कानाखाली मारल्याचा फटका वर्मी लागल्याने आई अवतार कौर यांचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Ghaziabad Viral Video: गाझियाबादमधील महिलेने आपल्या खांद्यावर मुलीला बसवून चालवली बुलेट; धोकादायक स्टंट पाहून तुम्हीही व्हाल हैराण)

आई आणि मुलाचा वाद सुरु असताना अवतार कौर यांची सूनही तिथेच होती. घटास्थळी उपस्थित असलेल्या सुनेने अवतार कौर यांना रुगणालयात नेले. मात्र डॉक्टरांनी कौर यांना मृत घोषीत केले. या प्रकरणात बिदापूर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी रणबीर अवतार याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवतार याला अटक केली आहे.