बुटके जिराफ (Photo Credits: Giraffe Conservation Foundation YouTube)

जगात असे बरेच प्राणी आहेत ज्यांविषयीची अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. विशेषतः असे काही प्राणी आहेत जे त्यांच्या शरीर संरचनेबद्दल चर्चेत असतात. आत आज आम्ही तुम्हाला अशाच दोन जिराफबद्दल (Giraffes)  सांगणार आहोत ज्यांनी सर्वांना चकित केले आहे. कारण, हे काही सामान्य जिराफ नाहीत, यातील एकाची उंची 9.4 फूट आहे, तर दुसर्‍याची उंची 8.5 फूट आहे. म्हणजेच हे दोन्ही जिराफ बुटके (Dwarf) आहेत. जिराफ हा उंच प्राण्यांपैकी एक समजला जातो, मात्र आता नाम्बिया (Namibia) आणि युगांडा (Uganda) येथे बुटके जिराफ आढळल्याने वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अहवालानुसार वैज्ञानिकांना युगांडा आणि नाम्बियामध्ये अशी दोन जिराफ सापडली आहेत, ज्याच्या उंचीने त्यांना आश्चर्यचकित केले आहे. जिराफची उंची साधारणत: 18 फूट असते. मात्र या दोन जिराफची उंची 9.4 आणि 8.5 फूट आहे. असे म्हटले जात आहे की या जिराफचा शोध कन्झर्वेशन फाऊंडेशन आणि स्मिथसोनियन कन्झर्वेशन बायोलॉजी संस्थेने लावला आहे. आता या जिराफची उंची इतकी कमी का आहे याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

सुरुवातीच्या तपासणीत मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन जिराफ बुटकेपणाशी झुंज देत आहेत. वैज्ञानिक भाषेत त्याला स्केटल डिस्प्लेसिया असे म्हणतात. संशोधकांचे म्हणणे आहे की हा असा आजार आहे ज्याच्या अंतर्गत हाडे पूर्ण विकसित होत नाहीत. वय वाढते, परंतु उंची लहानच राहते. अहवालात असे म्हटले आहे की हा रोग मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्येही होतो. जिराफमधील असे प्रथमच प्रकरण आहे. इतकेच नाही तर कमी उंचीमुळे जिराफला चालण्यातही खूप त्रास होतो. याक्षणी, अद्याप यावर संशोधन चालू आहे. (हेही वाचा: साडी नेसून महिला मारते कोलंटी उड्या आणि करते धमाकेदार स्टंट ; Video पाहून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का)

याबाबत गेल्या महिन्यात ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये वैज्ञानिकांनी त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये जिराफची मान लांब होती, परंतु त्यांच्या छोट्या पायांमुळे त्यांची उंची कमी होती.