ऐकावं ते नवलचं! दारु पिऊन तरुणाने केला सापासोबत नागीण डान्स; पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
drunk man dance with snake (PC- twitter)

तुम्ही आतापर्यंत नागीण डान्स करणाऱ्या अनेक लोकांचे व्हिडिओ पाहिले असतील. परंतु, तुम्हाला माहित आहे का, राजस्थानमधील दौसा (Dausa Rajasthan) येथील एका तरुणाने दारु पिऊन चक्क सापासोबत नागीण डान्स (Drunk Man Dance with Snake) केला आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुणाने सापाची वाट अडवली असून तो या सापासोबत चक्क गप्पा मारत बसला आहे.

या तरुणाने सापाला अर्धा तास पकडून त्याच्यासोबत वेगवेगळ्या कसरती केल्या. विशेष म्हणजे सापाने या तरुणाच्या तावडीतून सुटण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, या सापाचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. हा सर्व प्रकार तेथील स्थानिक रहिवाशी पाहत होते. मात्र, कोणीही हा खेळ थांबवण्यास पुढे आले नाही. (हेही वाचा - पुदुचेरी च्या उपराज्यपाल किरण बेदी यांचा अजब दावा; सूर्यातून 'ओम' आवाज येतो या त्यांच्या वक्तव्यामुळे आल्या ट्रोलर्सच्या रडारवर)

मद्यधुंद तरुणाच्या तावडीतून सुटण्यासाठी साप प्रयत्न करत होता. मात्र, हा तरुण त्याला पळत जाऊन पुन्हा पकडत होता. या सर्व नाट्यानंतर दोन तरुणांनी पुढे येऊन मद्यधुंद तरुणाच्या तावडीतून सापाची सुटका केली. मद्यधुंद तरुणाला सापाने अनेक ठिकाणी दंश केला होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप या तरुणाच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहुन तुम्ही नक्की अवाक झाले असाल.