प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Doctors Removed Large Fungal Ball From Heart Valve: नोएडातील एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनामधून बरे झाल्यानंतर हृदयात बुरशीजन्य संसर्ग झाल्याची माहिती समजली. त्यामुळे वृद्धांच्या हृदयाच्या महाधमनी वाल्वमध्ये (Heart Valve) 6 सेमी आकाराचा गाठीसारखा बुरशीचा गोळा (Large Fungal Ball) तयार झाला होता. यावर्षी जानेवारीमध्ये, गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बुरशीजन्य गोळा काढून टाकण्यासाठी हृदय शस्त्रक्रिया केली आणि नवीन वाल्व पुन्हा स्थापित केला. मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी हृदयाच्या झडपातील बुरशीजन्य संसर्गाचे दुर्मिळ प्रकरण समोर आल्याचे सांगितले. या शस्त्रक्रियेनंतर सुरेश चंद्र नावाचे वृद्ध व्यक्ती आता पूर्णपणे निरोगी आहेत.

रुग्णालयाच्या कार्डिओथोरॅसिक सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉ. उगीथ धीर यांनी सांगितले की, वृद्धांला यापूर्वीही हृदयाच्या झडपाचा आजार होता. यामुळे सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचा एक महाधमनी वाल्व बदलण्यात आला होता. अशा रुग्णांच्या व्हॉल्व्हमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. परंतु, दहा लाख रुग्णांपैकी केवळ एकच त्याचा बळी ठरतो. (हेही वाचा - IVF Success Story: 54 वर्षांच्या संसारानंतर 70-75 वर्षाच्या वृद्ध जोडप्याच्या आयुष्यात IVF च्या माध्यमातून आलं बाळ)

कोरोनामधून बरे झाल्यानंतर झाला संसर्ग -

हा संसर्ग झाल्यास रुग्णाच्या जगण्याची शक्यता 50 टक्के असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी वृद्धाला कोरोना झाला होता. बरे झाल्यानंतर काही वेळातच त्याचे वजन कमी होऊ लागले. ताप, खोकल्याचा त्रास सुरू झाला. याआधी त्यांना उपचारासाठी इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सीटी स्कॅन तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना फुफ्फुसात फायब्रोसिस झाल्याचे सांगितले.

तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी त्यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात नेले. तेथे रक्तसंवर्धनाची तपासणी केल्यानंतर रुग्णाला बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रान्स एसोफेजल इकोकार्डियोग्राम (टीईई) चाचणी केली आणि वाल्वमध्ये बुरशीचा संसर्ग असल्याचे आढळून आले.

दरम्यान, 13 जानेवारी रोजी वृद्धांवर शस्त्रक्रिया करून व्हॉल्व्ह बदलण्यात आला. यादरम्यान, रुग्णाला हार्ट लंग मशीनवर ठेवण्यात आले आणि विशेष फिल्टरच्या मदतीने शरीरातील बुरशीजन्य संसर्ग काढून टाकण्यात आला. आता वृद्ध निरोगी आहे.