Diljit Dosanjh & Ivanka Trump Photo At Tajmahal (Photo Credits: Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांचा भारत दौरा संपून आता जवळपास आठवडा होत आला तरी सोशल मीडियावर या चर्चांना काही फुलस्टॉप लागत नाहीये, भारतात ट्रम्प यांच्या दौऱ्यामधील फोटोंवर कोण जास्त मजेशीर मीम बनवतो याची जणू काही स्पर्धाच रंगली आहे. तुम्हीही आतापर्यंत असे अनेक मीम पहिले असतील. ट्रम्प यांच्या सोबतच त्यांची लेक म्हणजेच इवांका ट्रम्प (Ivanka Trump)  यांचा सुद्धा ताजमहाल (Tajmahal) येथील कठड्यावर बसलेला एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, आपल्याकडील अनेक मीम आर्टिस्ट या फोटोच्या शेजारी अनेक फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत, इतकंच कशाला तर सिंगर दिलजीत दोसांज याने सुद्धा इवांका यांच्या फोटोशेजारी स्वतःला फोटोशॉप करून बसलेले दाखवणारा एक फोटो ट्विट केला होता, यावर आता इवांका ट्रम्प यांची प्रतिक्रिया सुद्धा हिट झालेली दिसून येतेय.

दिलजीत याने हा मीम कम फोटो शेअर करताना त्यावर पंजाबी मध्ये कॅप्शन लिहिले आहे, "ही ऐकतच नव्हती मला म्हणाली ताजमहाल ला घेऊन चल म्ह्णून आम्ही आता इथे आलो आहोत" असे दिलजितचे कॅप्शन होते, ज्यावर इवांका यांनी रिप्लाय करत "नक्कीच हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता, मला हा सुंदर ताजमहाल दाखवण्यासाठी दिलजीत तुझे आभार" असे गंमतीत उत्तर दिले आहे. अर्थात तिचा रिप्लाय आलेला पाहून दिलजीतच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यानेही तातडीने, “धन्यवाद इव्हांका. मी सगळ्यांना सांगून सांगून थकलो की हा फोटो खोटा नाहीये. भेटू लवकरच. पुढच्या वेळेस लुधियानाला जाऊ! ”असा रिप्लाय केला आहे.

पहा दिलजीत दोसांज आणि इवांका ट्रम्प यांचा फोटो

दरम्यान, दिलजीतच्या फोटोखाली एका ट्विटर युजरने तुम्हाला उशीर झाला भाऊ असे म्हणत इवांका सोबत फोटोशॉप केलेले काही हिट मिम्स पाठवले आहेत. यावर सुद्धा इवांका ने उत्तर देत तुमच्या या आपुलकीचा मी आदर करते, मी भारतात खूप नवीन मित्र बनवले आहेत असा रिप्लाय केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा 'बाहुबली' भूमिकेतील 'हा' व्हिडिओ पाहिलात का? Watch Video

पहा ट्विट

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका सभेत भाषण करत असताना आपण भारताच्या दौऱ्याने भारावून गेल्याचे सांगितले, मोटेरा स्टेडियम मध्ये लाखभर व्यक्तींच्या समोर भाषण देताना आलेला अनुभव घेतल्यावर आता पुन्हा कधी मी कोणासमोर बोलण्यासाठी इतका उत्सुक होईन असे वाटतं नाही असेही ट्रम्प यांनी म्हंटले होते, डोनाल्ड ट्रम्प आपल्या परिवारासोबत 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर आले होते.