राजस्थान पोलिसांनी लॉकडाऊननंतर 'अजमेर शरीफ दरगाह'ला दिली भेट? अमजेर पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण
Fact check of Ajmer police visiting Dargah. (Photo Credit: Screengrab/File)

कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. कोरोना व्हायरसच्या संकट काळात चिंताजनक वातावरण निर्माण झाल्याने त्यासंबंधित आलेली कोणतीही माहिती तात्काळ व्हायरल होत आहे. यात आता अजून एका व्हिडिओची भर पडली आहे. या व्हिडिओत कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी राजस्थान (Rajasthan) मधील अजमेर पोलिसांनी (Ajmer Police) मोर्चा काढल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच अजमेर पोलिस कर्मचाऱ्यांनी अजमेर शरीफ दर्गा येथे जावून प्रार्थना केल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, पोलिसांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. (Bharat Biotech Vice-President Dr V.K. Srinivas Takes First Shot Of COVID-19 Vaccine? COVAXIN च्या निर्मात्यांनी फेटाळला दावा, जाणून घ्या सत्य)

हा व्हिडिओ 30 सेकंदाचा आहे. अजमेर पोलिस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांनी सांगितले की, "अजमेर शरीफ दर्गा अद्याप भाविकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. "दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलिस विभागकडून फ्लॅग मार्च काढण्यात आला होता." कोविड-19 संदर्भात जनजागृती करण्यासाठी अमजेर पोलिसांनी काढलेली जागरुकता रॅलीचा व्हिडिओ 30 जून रोजी शेअर करण्यात आला होता.

The video uploaded by Facebook user:

Ajmer Police Tweet:

त्यामुळे फेसबुक युजर करत असलेला दावा खोटा आहे. अजमेर पोलिस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, "29 जून रोजी 4 किलोमीटरची कोविड-19 जागरुकता रॅली  काढण्यात आली होती."