Delhi: दिल्लीत रोटी बनवताना त्यावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
रोटीवर व्यक्ती थुंकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Photo Credits-Twitter)

Delhi: रस्त्यावरील फूड्स स्वस्तात मस्त मिळतात म्हणून आपण खायला जातो. परंतु ते कोणत्या पद्धतीने बनवतात कुठे बनवले जातात याचा आपण थोडा विचार करायला हवा. कारण सध्या गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ हे गलिच्छ जागी तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याच्या घटना आता आणि याआधी सुद्धा समोर आल्या आहेत. अशातच  दिल्लीत ही असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात एक व्यक्ती रोटी बनवत असून त्यावर थुंकत असल्याचे दिसून येत आहे. याचा व्हिडिओ सध्या तुफान सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन व्यक्ती रोटी बनवण्यासाठी उभे आहेत. त्यामधील एक व्यक्ती दुसऱ्याला रोटी बनवण्यासाठी गोळे करुन देत असून दुसरा त्याची रोटी बनवताना दिसतोय. परंतु रोटी बनवून झाल्यानंतर ती भाजण्यासाठी ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती त्यावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Tweet:

याआधी गाझियाबाद येथील भोजपुर मध्ये सुद्धा रोटी तंदुर मध्ये भाजण्यासाठी टाकण्यापूर्वी त्यावर थुंकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर एका समाजिक कार्यक्रमात हा प्रकार घडला होता आणि त्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी व्यक्तीला अटक केली होती.