Road Accident Video: घराबाहेरील रस्त्यावर झाडू मारणाऱ्या महिलेला एका भरधाव कारने धडक दिली. ज्यामध्ये महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना राजधानी दिल्ली येथील गीता कॉलनी (Delhi Geeta Colony Accident Video) परिसरात घडली. या घटनेचे धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जे आता सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. आमच्या वाचकांना आणि पाहणाऱ्यांना सूचना अशी की, व्हिडिओतील दृश्य आपणास विचलीत करु शकते.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला घरासमोरील रस्त्यावर झाडू मारत आहे. ती आपले काम एकाग्रतेने करते आहे. रस्ता तसा निर्मनुष्य आहे. वाहने आणि नागरिकांची तुरळक ये-जा सुरु आहे. इतक्या एक कार भरधाव वेगाने येते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटते आणि ही कार थेट महिला धडक देते. धक्कादायक म्हणजे ही कार पुढे थेट इमारतीत शिरते आणि भींताला धडकून थांबते. जर भींत नसती तर कदाचित ही कार तशीच पुढे गेली असती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, कार इतकी वेगाने येते की महिलेला सावरण्यासही वेळ मिळत नाही. ज्यामुळे महिला कारखाली चिरडली जाते आणि पुढे कार आणि भींत यांमध्ये चेंगरली जाते. सांगितले जात आहे की, महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, Video Viral: लोकल ट्रेनला लटकून तरुणाचा खतरनाक स्टंट,धक्कादायक Video व्हायरल)
कारमध्ये चालक आणि आणखी एक युवती असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. काहने महिलेला धडक दिल्यानंतर ही युवती कारमधून बाहेर येते आणि चालकास कार मागे घेण्यास सांगते. चालक कार मागे घेतो. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा होतात. ते महिलेला बाहेर काढतात. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 55 वर्षांची आहे. चालकाविरोधात गीता कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
व्हिडिओ
A car driver hit an elderly woman who was sweeping outside her house in Delhi's Geeta Colony area. pic.twitter.com/He4jZdXjId
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) March 20, 2024
अशाच प्रकारची घटना दिल्ली येथील बेलगाम परिसरात घडली आहे. त्याच्या काहीच काळ आगोदर पूर्व दिल्ली येथील गाजीपूर येथेही बुध बाजारात कारने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे बुध बाजारातील घटनेत वेगवान कारने तब्बल 15 जणांना चिरडले होते. कार चालक नशेत तर्रर्र होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.