Dangerous Wedding Photoshoot, Video: लग्नात फोटोशूट, व्हिडिओ काढण्यासाठी धक्कादायक प्रकार, वधू वराच्या कपड्यांना लावली आग
Dangerous Wedding Photoshoot | (Photo Credit - Instagram)

लग्नाचे फोटो काढणे हे आता नवीन राहिले नाही. जवळपास सर्वच जोडपी लग्ना आगोदर, लग्नात आणि लग्नानंतर फोटो काढत असतात. त्याला वेडींग फोटोशूट (Wedding Photoshoot)म्हटले जाते. आता त्याला व्यावसायिक स्पर्श लाभल्याने हे फोटोशूट करताना ननवीन कल्पनाही राबवल्या जातात. काही कल्पना तर इतक्या अचाट असतात की या भयावह वेडींग फोटोशूट (Dangerous Wedding Photoshoot) सोशल मीडियावर व्हायरल होते. कधीकधी ते जीववरही बेतू शकते. असेच एक फोटोशूट सुरु असतानाचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात फोटोशूटसाठी चक्क वधू वराच्या कपड्यांनाच आग लावली जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. एका वेंडिंग फोटोशूटमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी रियल लाईफ स्टंट करणारे जोडपे पाहायला मिळत आहे. हा स्टंट Gabe Jessop आणि Ambyr Bambyr यांच्या लग्नातील फोटोशूटवेळचा आहे. दोघांनीही हे फोटोशूट करण्यासाठी एक हटके कल्पना राबविण्याचा विचार केला. ज्यासाठी त्यांनी चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली. अर्थात हा धोकादायक प्रकार करताना अग्निशमनासाठी आवश्यक अशी सर्व तयारी केली होती. संभाव्य धोका विचारात घेऊन तो निवारणाची आगोदर पूर्ण तयारी केली होती. त्यानंतरच त्यांनी हे धाडसी पाऊल टाकले. फोटोशूट संपल्यानंतर आग विझविण्यासाठी लगेचच अग्निशमन दलाचा छोटा सिलींडरवापरण्यात आला. (हेही वाचा, Jhansi Bride Viral Video: परीक्षा देण्यासाठी लग्नाचे विधी सोडून नवरा मुलगा वधूला घेऊन पोहोचला परिक्षा केंद्रावर; पहा व्हायरल व्हिडिओ)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांना खूपच आवडला आहे. अनकांनी म्हटले आहे की, अशा प्रकारचे फोटोशूट आम्ही पाहिले नव्हते. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत शेकडो लाईक मिळाल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे तर काहींनी उगाचच जीव धोक्यात घालणारी नसती उठाठेव कशाला करायची? असा सवालही विचारला आहे.