Dabur's Karwa Chauth Ad: करवा चौथ निमित्त समलैंगिक जोडप्यासह Fem Bleach ची जाहिरात; सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीया (View Tweets)
Dabur's Karwa Chauth Ad (Photo Credits: Youtube)

दसरा, करवा चौथ, दिवाळी या सणासुदीच्या काळामध्ये भरपूर जाहिराती (Ads) पाहायला मिळतात. या दरम्यान, वेगवेगळे नवीन प्रॉडक्टस (New Products) आणि डिस्काऊंट (Discounts) बद्दल लोकांना माहिती देणाऱ्या जाहिराती अनेक माध्यमांतून  समोर  येतात. तसंच काही वेळाला एखादा संदेश देण्याच्या उद्देशाने देखील जाहिरात काढली जाते. असा एक वेगळा संदेश देण्यासाठी डाबरने करवा चौथ (Karwa Chauth) चे औचित्य साधत एक जाहिरात सादर केली आहे. या जाहिरातीला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

ही जाहिरात एका फेस ब्लिचिंग प्रॉडक्टची आहे. यामध्ये दोन तरुण महिला त्यांच्या पहिल्या करवा चौथसाठी तयार होताना दिसत आहेत. तयार होताना या महिला फेस प्रॉडक्ट्स वापरताना दिसत आहेत. या दोन्ही महिलांना घरातील एक जेष्ठ महिला सणासाठी नवीन कपडे देताना दिसत आहे आणि या महिला करवा चौथच्या उपवासासंबंधी चर्चा करत आहेत. त्यानंतर या महिला एकमेकांसमोर उभ्या राहून करवा चौथ साजरी करत आहेत. जाहिरातीमधील हा शेवटचा ट्विट समलैंगिक जोडप्यांना प्रमोट करण्यासाठी डाबरने केला आहे.

पहा जाहिरात:

सोशल मीडियावर या जाहिरातीला काही युजर्सकडून पाठिंबा मिळत आहे. तर काही युजर्सकडून यावर निषेध नोंदवला जात आहे. या जाहिरातीमध्ये दाखवले जाणारे करवा चौथचे सेलिब्रेशन हे हिंदू धर्मातील पवित्र परंपरा असलेल्या यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच या जाहिरातीद्वारे गौर वर्णाला प्रमोट केले जात असल्याचे वर्णभेदाला प्रोत्साहन दिले जात आहे, अनेकांचे म्हणणे आहे.

पहा ट्विट्स:

 

जाहिरातीवर आलेल्या या प्रतिक्रीया संमिश्र आहेत. काहींना हिंदू सणाची ही आधुनिक कल्पना भावली आहे. तर काहींनी याचा निषेध केला आहे. दरम्यान, समलैगिंक जोडप्यांना कायदेशीररीत्या मान्यता असली तरी अद्याप समाज मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जाहिरातीद्वारे हा नवा प्रयोग करण्यात आला असावा.