चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चे गोलंदाजी प्रशिक्षक आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji )यांचे नाव ट्विटरवर ट्रेंड होत आहे. यादरम्यान, त्याच्या अपघाताबद्दल बॉलिवूड इनसाइडर (Bollywood Insider) ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या अपघाताबद्दल ट्विट केले गेले, जे व्हायरल झाले आहे.या ट्विटर अकाऊंटवर असे लिहिले होते की लक्ष्मीपती बालाजी एका अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांनी एक फोटोही शेअर केला असून ती कार लक्ष्मीपती बालाजीची असल्याचा दावा केला आहे.एका दुसऱ्या ट्वीट मध्ये 'RIP Lakshmipathy Balaji' असे ही लिहिले गेले आहे.जाणून घेऊयात नक्की काय खरे आहे.
What????
Lakshmipathy Balaji is trending and a twitter account says he's met with an accident! 👇
Hope everything is fine!
Can anyone confirm??? pic.twitter.com/bUprj84C5H— hum_bolega (@hum_bolega) October 15, 2020
लक्ष्मीपती बालाजीच्या अपघाताची बातमी खोटी आहे. इंडिया कॉन्टेस्ट(@india4contests) या अकाउंटवर ट्विटरवर प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न होता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोणत्या गोलंदाजाने प्रथम हॅटट्रिक केली ?लक्ष्मीपती बालाजीने2008 मध्ये किंग्स इलेवन पंजाब ( Kings XI Punjab ) विरुद्ध इतिहासातील पहिली हॅटट्रिक घेतली. या प्रश्नाला उत्तर म्हणून अनेकांनी लक्ष्मीपती बालाजी यांचे नाव लिहिले आणि यामुळे लक्ष्मीपती बालाजी हा नाव ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात केली.आणि त्यामुळेच त्याच्या अपघाताची खोटी बातमी व्हायरल होऊ लागली.
Why is Lakshmipathy Balaji trending? I hope he is ok.— Pushkar (@Myos_pasm) October 15, 2020
why fake news is running on #Lakshmipathy Balaji shame that social media user have some sense and responsibility you did it for SPB sir how many humans are effected through fake news— jobless indian darbar (@madhavanarasani) October 15, 2020
बालाजी सध्या CSK टीमसह दुबईत आहेत. 10 ऑक्टोबर रोजी सीएसकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, ज्यात बालाजींनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. बालाजी म्हणाले होते की सगळीकडे एमएस धोनी… एमएस धोनी…होत आहे.पण तो ही एक माणूस आहे.CSK परभवानंतर सगळ्यांचे लक्ष धोनी कडे होते. बालाजी सध्या CSK टीमबरोबर बायो-बबलमध्ये आहेत. ट्विटर यूजर्सने देखील अशी मागणी करत आहेत की, ज्या ट्विटर हँडलने बालाजीच्या अपघाताची बातमी पसरविली आहे त्याला रिपोर्ट करायला पाहिजे.