Cow on Bike:सोशल मीडिया अथवा इंटरनेटवर केवळ देसी जुगाड व्हिडिओ (Desi Jugaad Video) असे दोन शब्द जरी टाईप केले तरी आपल्याला खूप व्हिडिओ पाहायला मिळतात. यातले काही जोरदार व्हायरल झालेले असतात. पण यातले काही असे काही विचित्र असतात की पाहणाराही थक्क होऊन जातो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक गाई चक्क बाईकवर बसलेली दिसते. होय, एका तरुणाने आश्चर्य वाटावा असा काहीसा विचित्र प्रयोग केला आहे. या तरुणाचा हा देसी जुगाड पाहून रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासीही चांगलेच थक्क झाले आहेत. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.
व्हिडिओत आपण पाहू शकता की एका व्यक्तीने आपल्या बाईकवर चक्क गाई बसवली आहे. विशेष म्हणजे ही गायही या व्यक्तीच्या बाईकवर आरामात बसली आहे. अर्थात त्याने गाईला बाईकवर बांधले आहे. पण, तरीही इतकी मोठी गाय बाईकवर आणि तीही इतक्या शांतपणे बसली तरी कशी? असा सवाल निर्माण होतोच. हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर हा व्हिडिओ जरुर बघा. (हेही वाचा, Desi Jugaad Bullet Video: विनापेट्रोल चालणारी बुलेट, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यालाही फायदा; पाहा व्हिडिओ)
व्हिडिओ
Cow is riding on bike, first time, must watch pic.twitter.com/xJlYmGvsfP
— Ram ramji (@RajeshLathigara) September 18, 2020
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @RajeshLathigara नावाच्या एका ट्विटर हँडलवर 18 सप्टेंबर 2020 रोजी शेअर करण्यात आला होता. व्हिडिओसबत कॅप्शन लिहिण्यात आली आहे. 'आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच बाईकवर बसली आहे गाय. या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक व्यक्ती गाईला आपल्या बाईकवर डबलशीट घेऊन निघाला आहे. गाईला बाईकवर बांधून हा व्यक्ती आरामात निघाला आहे. विशेष म्हणजे गायही बाईकवर बसून आरामत निघाली आहे.'