कोरोना रुग्णांनी घेतला अंताक्षरीचा आनंद (pc - Twitter)

'यम्मा यम्मा ये खुबसुरत समा...बस आज कि रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा', हे गाणं म्हणत दादर (Dadar) येथील डीसिल्वा स्कूल (D’Silva School) मधील कोरोना रुग्णांनी (Covid Positive Patients) अंताक्षरीचा (Antakshari) आनंद घेतला. मुंबई सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (Mumbai Assistant Commissioner Kiran Dighavkar) यांनी या क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'मनुष्य हा एक मनोरंजक प्राणी आहे. हळू हळू तो कोणत्याही परिस्थितीसह जगणे शिकतो,' असं कॅप्शन दिघावकर यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 22 हजार पेक्षा जास्त झाली आहे. मात्र, तरीदेखील कोरोना रुग्णांमध्ये स्पिरिट कायम आहे. कोरोनाची लागण झाली असतानादेखील रुग्णांनी अंताक्षरीचा आनंद लुटला आहे. यावेळी दादर येथील डीसिल्वा स्कूलमधील कोरोनाग्रस्तांनी 'यम्मा यम्मा ये खुबसुरत समा' हे गाणं म्हणत नवा संदेश दिला आहे. (हेही वाचा - Mumbai Coronavirus Update: मुंबईत कोरोना विषाणूचा हाहाकार; दिवसभरात 1 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद तर, 43 जणांचा मृत्यू)

सध्या सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून कोरोनाग्रस्तांप्रति अनेकांच्या भावना दाटून आल्या आहेत. या व्हिडिओवर काही युजर्संनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, हा व्हिडिओ हृदयस्पर्शी आहे. जेव्हा लोक एकता आणि करुणेने एकत्र येतात तेव्हा मानवी आत्म्याचा विजय होतो. तसेच काहींना या कोरोनाग्रस्तांसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.