Mumbai Coronavirus Update: मुंबईत कोरोना विषाणूचा हाहाकार; दिवसभरात 1 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद तर, 43 जणांचा मृत्यू
Covid 19 (Photo Credit Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही सकारात्मक बदल दिसून आला आहे. मुंबईत (Mumbai) आज कोरोनामुळे आज 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 1 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 22 हजार 563 वर पोहचली आहे. यापैंकी 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार 139 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांपैकी 3 हजार 163 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 39 हजार 174 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Vande Bharat Abhiyan: 'वंदे भारत अभियान' अंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1 हजार 972 नागरिक दाखल; राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भावामुळे मुंबई शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या भारतात चौथ्या लॉकडाउनच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.