Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाउन दरम्यान विविध शहरात अडकून पडलेल्या नागरिकांना आपपल्या जातात जात यावा म्हणून संपूर्ण देशात श्रमिक विशेष ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मात्र, काही राज्य आपल्या नागरिकांना राज्यात घेण्यास नकार देत आहे. जे राज्य त्यांच्या नागरिकांना त्यांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच 'वंदे भारत अभियान' अंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1 हजार 972 नागरिक दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.

जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार नाही त्यांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय,विदेश मंत्रालय,गृह मंत्रालयाच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थांत्मक क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक आले असल्याची माहिती दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले आहे. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 1 हजार 353 कोरोनाबाधित; गेल्या 24 तासात 26 नव्या रुग्णांची नोंद

मुख्यमंत्री कार्यलयाचे ट्विट-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊन 4.0 बाबात नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात यापुढे केवळ 1) कंटेनमेंट झोन, 2) रेड झोन, 3) नाँन रेड झोन असणार आहेत. या नव्या नियमावलीनुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन असणार आहेत. तर रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतूक करता यणार आहे. दुसऱ्या बाजूला रात्री 7 ते सकाळी 7 या काळात कर्फ्यू असणार आहे.