COVID-19 Vaccine Registration: 18  वर्षांवरील नागरिकांचं CoWIN Portal,Aarogya Setu App वर रजिस्ट्रेशन होत नसल्याने अनेकांनी आळवला ट्वीटर वर नाराजीचा सूर
Corona Vaccine | | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतामध्ये कोरोनाचा धोका रोखण्यासाठी आता लसीकरण वेगवान करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. देशातील कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा येत्या 1 मे पासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सार्‍यांनाच लस दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आज (28 एप्रिल) पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र अनेकांनी रजिस्ट्रेशन उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली आहे. तरूणांनी ट्वीट करत कोविन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन होत नसल्याच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरूवात केली आहे.

काही नेटकर्‍यांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाला ट्वीटर वर टॅग करता रजिस्ट्रेशन करताना अजूनही केवळ 45 वर्षांवरीलच लोकांचे लसीकरण सुरू असल्याचा मेसेज दाखवत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहेत. 28 एप्रिलच्या मध्य रात्री 12 च्या ठोक्यापासूनच अनेकांनी रजिस्ट्रेशन साठी प्रयत्न सुरू केले होते पण अद्याप ते सुरू न झाल्याची तक्रार आता समोर येत आहे. नक्की वाचा: Covid 19 Vaccination Registration: 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 28 एप्रिलपासून सुरू होतयं रजिस्ट्रेशन; इथे पहा आवश्यक डॉक्युमेंट्स, शुल्क, CoWIN Portal वर कशी कराल नोंदणी.

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्रात कालच कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये राज्याने दीड कोटीचा टप्पा ओलांडला आहे. आता 18 वर्षांवरील तरूण नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिका, राज्य सरकार प्रशासन सज्ज होत आहे. पण लसींचा साठा आणि लसीकरण केंद्रांवर सुरक्षित लसीकरण पार पाडण्याचं मोठं आवाहन सरकार समोर आहे. केंद्र सरकारच्या सध्याच्या नियमावलीनुसार, 19 ते 44 वयोगटातील लोकांना ऑन द स्पॉट लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा पर्याय नसेल त्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक असताना अद्याप रजिस्ट्रेशन सुरू न झाल्याने अनेकांनी ट्वीटर वर नाराजीचा सूर आळवला आहे.