भारतात (India) वाढणाऱ्या कोरोना व्हायरस (Coronavirus) रुगणांचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. सरकारच्या आदेशानुसार लोकं लॉकडाउनचे अनुसरण करीत नाहीत असे देशात दिसून येत आहे. शिवाय, सर्व राज्यातील पोलिस नागरिकांना या साथीच्या आजारापासून वाचविण्यासाठी लॉकडाउनच्या नियमाचे अनुसरण करण्याचे आवाहन करीत आहेत. तरीही नागरिक लॉकडाउनचे अनुसरण करीत नाहीत आणि रस्त्यावर फिरताना दिसत आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुपूर पोलिसांनी स्वतः नाटक म्हणून एक व्हिडिओ शूट केला असून, लॉकडाउनबद्दल लोकांना जाणीव करून देण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लोक हसून लोटपोट होऊन जातील. (टिक टॉक व्हिडीओ रुबाबात बनवला; मुंबई पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवताच माफी मागाय लागला; Tik Tok Star ला अशी घडली अद्दल)
पोलिसांनी शूट केलेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पोलिस रस्त्यावर बाईक वरून जात असेलेल्या लोकांना थांबवल्याचे पाहायला मिळते. एका बाईकवर तीन तर दुसऱ्यावर दोन लोकं बसलेले दिसून येत आहे. त्यापैकी कोणीही आरोग्य मंत्रालयाद्वारे सांगण्यात आल्यावर मास्क परिधान केलेले नाहीत. अशा स्थितीत पोलिस जबरदस्तीने पाचही मुलांना अॅम्ब्युलन्समध्ये घालते. यामध्ये कोरोनाचा एक रुग्ण आधीच स्ट्रेचरवर पडलेला दिसत आहे. कोरोना रूग्ण पाहून ते सर्व घाबरुन जातात आणि सर्व रुग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी हातपाय मारतात. दरम्यान, ते पोलिसांकडे त्यांना सोडण्याची वारंवार विनवणी करतात. ते कधी खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करतात तर कधी दारातूनरुग्णवाहिकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रुग्णवाहिकेत असलेला माणूस कोरोनाचा रुग्ण नसतो. व्हायरल व्हिडिओ पाहा:
Fun panrom by Tiruppur Police 👮♂️😂😂😂pic.twitter.com/1YL3TgX2Js
— #Master (@_imjone) April 24, 2020
दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गा झालेल्या एकूण 1683 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यातून 752 लोकं बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात संक्रमितांचा आकडा 24,942 वर पोहचला आहे. शिवाय मागील 24 तासात 1490 रुग्णांची नोंद झाली आहे.