Coronavirus mutation memes (Photo Credits: Twitter)

मागील वर्षभर जगात कोरोना वायरसचा धुमाकूळ सुरू होता. 8-9 महिने जग या जीवघेण्या कोरोना वायरस आणि कोविड 19 चा सामना करत पूर्ववत होत असल्याची स्थिती असतानाच आता युके मध्ये कोरोना वायरसने रूप बदलल्याची माहिती समोर आली आहे. हा नवा वायरसचा प्रकार 70% अधिक वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करत युके पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लंडन, इंग्लंडमध्ये कोविड 19 लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. दरम्यान क्रिसमसचा सण आणि न्यू इयर सेलिब्रेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना ब्रिटनमधील या कोरोना वायरसच्या संसर्गामुळे अनेक देशांनी युकेमधून येणारी विमानसेवा रोखली आहे. हा वायरस खूपच जीवघेणा असल्याचं अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगत WHO ने चिंता न करण्याचं आवाहन केले असले तरीही ऐन सुट्ट्यांच्या काळात कोरोनाचं संकट गडद झाल्याने सोशल मीडीयातही यावर मिम्स, विनोद बनायला सुरूवात झाली आहे.

2020 वर्ष अनेकांसाठी नकारात्मक, तणावात गेलं असल्याने 2021 च्या नवं वर्ष नवी सुरूवात अशी धारणा ठेवत अनेकांनी सेलिब्रेशन, शॉर्ट ट्रीप्सचे प्लॅन केले होते. पण ब्रिटन पाठोपाठ आज ब्रिटनमधून काही दिवसांपूर्वी इटलीत परतलेले एक दांपत्य देखील नव्या कोरोना वायरस प्रजातीने बाधित असल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा अनेकांच्या मनात या कोरोना वायरसबददल भीती वाढली आहे. भारतामध्ये अद्याप त्याचा प्रभाव जाणवला नसला तरीही नेटकर्‍यांनी या गोष्टीमधून काही मजेशीर मिम्स नक्कीच बनवले आहेत.

कोरोना वायरस नव्या प्रजातीच्या विषाणूवरील मिम्स

दरम्यान जगात कोविड 19 लसीकरणाला सुरूवात करणारा देश देखील युके आहे. त्यामुळे 2020 सोबतच या लसीकरणातून आगामी नव्या वर्षात सकारात्मकता येवो. कोविड 19 आरोग्य संकटाचा नाश व्हावा आणि सध्याचा हा कडक लॉकडाऊन देखील वायरसचा फैलाव रोखण्यात यशस्वी ठरावा हीच प्रार्थना!