Mumbai Police Logical Puzzle: कोरोना व्हायरस जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर घातले कोडे 'Crack the Code'
Mumbai Police Logical Puzzle | (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग टाळण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) नेहमीच जनजागृती करताना दिसले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुंबई पोलीस नेहमी सक्रीय असतात. आजही मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन कोरोना व्हायरस जनजागृती (Coronavirus Awareness) करण्यासाठी एक कोडे शेअर केले आहे. या कोड्याच्या माध्यमातून पोलीसांनी एक संदेश दिला आहे. हा संदेश करण्यासाठी आगोदर हे कोडे सोडवा (Crack the Code) असे आव्हान पोलिसांनी युजर्सला दिले आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटर (Mumbai Police Twitter) हँडलवर मिष्कीलपणे म्हटले आहे की, 'आमच्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे. हे कोडं सोडवा आणि वाचा!'

कोड्याचे उत्तर काय?

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेले कोडे लक्ष वेधून घेते. परंतू, प्रथमदर्शनी त्याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. त्यासाठी विचारांना थोडासा ताण द्यावा लागतो. त्यानंतर हळूहळू या कोड्याचा अर्थ समजायला मदत होते. कोड्यातील पहिल्या रखाण्याचा अर्थ आहे 'घरीच थांबा' (STAY HOME), दुसरा रखाना सांगातो की 'मास्क वापरा' (WEAR A MASK), तिसरा रखाना सांगतो 'हात धुवा' (WASH HANDS REGULARLY) आणि चौथा रखाना सांगतो एकमेकांमध्ये 'किमान 6 फुटांचे अंतर ठेवा' (6 FEET DISTANCE). (हेही वाचा, Fraud Message on WhatsApp: व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या 'या' मेसेजद्वारे होऊ शकते फसवणूक; मुंबई पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा)

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या या कोड्याचे उत्तर बहुतांश ट्विटर युजर्सनी दिले आहे. मात्र काहींनी डोक्याला ताण न देता मुंबई पोलिसांनाच सल्ला दिला आहे. या युजर्सने म्हटले आहे की, हे कोडे घालण्यापेक्षा थेट नवी कॉलर ट्यून (Caller Tune) दिली असती तरी चालले असते. नागरिकांच्या फोन कॉलच्या सुरुवातीला एक कॉलर ट्यून लागते. त्यात कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वं सांगितली जाता. त्या कॉलरट्यूनच्या आधारावर युजर्सची ही प्रितक्रिया दिसते आहे.