चीन येथील वुहान शहरात परसलेल्या कोरोना व्हायरचे (Coronavirus) जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या व्हारसचा परिणाम आता जगभरातील देशांवर होत असून डब्लूएचओ यांनी नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तसेच या व्हायरमुळे आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा भारतावरला धोका नसला तरीही विमानतळावर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकिय तपासणी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर सोशल मीडियात हरियाणा येथील एका शिबिरातील तरुणांना कोरोना व्हायरसवरील डान्स तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरुण मंडळी तोंडाला मास्क लावून गाण्यावर नाचताना दिसुन येत आहेत. तसेच त्यांच्यामधील एक तरुण या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत असून सर्वजण कोरोना व्हायरसमुळे आता पार्टी करताना पण तोंडाला मास्क लावण्याची गरज असल्याचे भासवून देत आहेत. ट्वीटरवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून युजर्सकडून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.(अबब! सापाने चक्क AK- 47 बंदूक खाल्ली? पहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे मजेशीर फोटो)
Tweet:
Meanwhile evacuated Indians in a #Coronavirus isolation camp in Manesar, Haryana 😂
(via @dhananjaypro) pic.twitter.com/HcTrI2qmTn
— Anisha Dutta (@A2D2_) February 2, 2020
दरम्यान चीन मध्ये आतापर्यंत या व्हायरस मुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 304 वर पोहचला आहे. या बाधित भागातून भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशी आणणारी एअर इंडिया कडून खाजगी विमानाची दुसरी फेरी आज वुहान येथून दिल्ली येथे पोहचली आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू असून आतापर्यंत 5, 128 प्रवासी तपासण्यात आले आहेत.