Cobra Viral video: स्कूटीमध्ये लपला कोब्रा, तरुणाने उघड्या हातांनी पकडला; पाहा रोमांच आणणारा व्हिडिओ
Cobra Viral Video | (Photo Credits: Instagram)

साप (Snake), नाग (Serpent) किंवा अजगर (Python) हे शब्द जीर उच्चारले तरी अनेकांना धक्का बसतो. ते इतके घाबरतात की हे प्राणी जणू त्यांच्या हातातच दिले आहेत. पण, काही लोकांना मात्र या प्राण्यांचे काहीच वाटत नाही. ते अगदी साधेपणाने आणि तितक्याच सामान्यपणे त्यांना हाताळतात. अर्थात यात जीवघेणी जोखीमही असते. त्यामुळे काही लोक याला धाडस म्हणतात तर काही अतिधाडस किंवा वेडाचार. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Cobra Viral video) झाला आहे. ज्यात पाहायला मिळते की, स्कुटीच्या (Scooty) पुढच्या भागात लपलेला किंग कोब्रा एक व्यक्ती अगदी उघड्या हातांनी पकडतो आहे. त्याला सामान्यपणे हाताळतो आहे.

धक्कादायक म्हणजे हा कोब्रा शांत बसला नाही. तर, तो फणा काढून फुत्कारतानाही दिसतो. स्कुटीमध्ये लपलेल्या भल्या दांडग्या कोब्राची सुटका करताना पाहून अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले असतील यात शंका नाही. घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेला जबडा उघडमारा कोब्रा पाहून नेटिझन्सला धक्का बसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन पाहायला मिळते. @avinashyadav_26 नावाच्या वापरकर्त्याने Instagram वर शेअर केलेली ही क्लिप 12k पेक्षा जास्त लाईक्स मिळवून व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, Poisonous Snakes in India: भारतातील विषारी फुरसे साप Shipping Container च्या माध्यमातून इंग्लंडला पोहोचला)

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, स्कूटीत लपलेल्या कोब्राला पकडण्यासाठी एक व्यक्ती स्क्रू ड्रायव्हर वापरतो आहे. इन्स्टाग्रामवर कोब्रा म्हणून ओळखला जाणारा साप स्कूटीच्या आतून डोके वर करतो. जिथे तो बहुधा लपला होता किंवा अडकला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता कोब्रा रागाने फुत्कारतो. परंतू, स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने, त्या व्यक्तीने आपल्या उघड्या हातांनी नागाला पकडण्यात यश मिळविले. प्रत्यक्षदर्शिंनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ही क्लिप काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आली आहे. सोशल मीडियावर केल्यापासून, क्लिपने 400k पेक्षा जास्त व्ह्यूव आहेत. ही संख्या अद्यापही वाढत आहे. व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी मात्र संमीश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींच्या मते साप पकडण्याची ही असामान्य पद्धत आहे. काही म्हणतात अत्यंत भीतीदायक व्हिडिओ. काहींनी कपाळावर हात मारत अरे देवा! असे म्हटले आहे.

इथे पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Avinash Yadav..! (@avinashyadav_26)

व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रभावीत झाला असाल तर हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, साप पकडण्यासाठी प्रशिक्षण आणि तंत्र आवश्यक आहे. त्याचा वापर योग्यरित्या केला नाही तर ते धोकादायक ठरू शकते. साप दिसला म्हणून कोणीही त्याला स्वतःहून वाचवण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी प्रशिक्षित कर्मचार्‍यांना सूचित केले पाहिजे.