Food | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

पॅन झियाओटिंग (Pan Xiaoting) या 24 वर्षीय इन्फ्लुएंसरचा (Influencer) थेट प्रक्षेपणादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिक पोर्टल हँक्युंगने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, लाईव्ह ब्रॉडकॉस्टींग सुरु असताना अति प्रमाणात खाल्ल्याने या तिचा मृत्यू (Pan Xiaoting Dies) झाला. पॅन झियाओटिंग अत्यंत अधिक प्रमाणात खाण्याच्या आव्हानांमध्ये सहभागी होण्यासाठी ओळखली जात होती. एका चॅलेंजमध्ये तिला ज्यामुळे तिला 10 तासांपेक्षा जास्त वेळ खाणे आवश्यक होते. मात्र, क्षमतेहून अधिक प्रमाणात खाल्याने तिचा मृत्यू झाला.

ग्रहण करायची तब्बल 10 किलो अन्न

पॅन झियाओटिंग हिच्या मृत्यूबाबत Creaders.com या चिनी पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, Xiaoting प्रत्येक भोजनावेळी 10 किलो पर्यंत अन्न खात होती. या अघोरी कृतीबद्दल तिच्या पालकांनी आणि हितचिंतकांकडून तिला वारंवार सावधानतेचा इशारा दिला जात होता. असे असतानाही जिओटिंगने या धोकादायक आव्हानांचा सामना सुरूच ठेवला होता. जो तिच्या जीवावर बेतला. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, झिओटिंगचे पोट "विदृप" (deformed) झाले होते आणि त्यात "न पचलेले अन्न" (Undigested Food) होते. आव्हान म्हणून ते खाल्ल्याने तिच्या शरीरावर किती गंभीर ताण होता हे तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट दिसत होते. (हेही वाचा, Kid Dies While Making Reel with Noose: रील बनवताना 11 वर्षांच्या मुलाचा फास लागून मृत्यू; मध्य प्रदेशातील मुरैना येथील घटना (Watch Video))

सोशल मीडियावर चिंता व्यक्त

झिओटिंगच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर इन्फ्लुएंसरची आव्हाने आणि आरोग्यांच्या चिंता यांबाबतच्या चर्चांना तोंड फुटले आहे. अनेकांनी अशा आव्हानांची गरजच काय, असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, "मला कधीच कळले नाही की, कोणाला कोणी जेवताना का पाहावेसे वाटते." दुसऱ्याने टिप्पणी केली, "मी एक व्यक्ती पाहतो, काही खात नाही." (हेही वाचा -Sambhaji Nagar Accident: रील काढताना Accelerator दाबला अन् कार थेट दरीत कोसळली, तरुणीने गमावला जीव (Watch Video))

प्रसिद्धीसाठी जीवघेणे स्टंट

पॅन झियाओटिंग हिच्या रुपात पुढे आलेली घटना सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी अत्यंत स्टंट आणि आव्हानांचे धोके अधोरेखित करते. एखादी व्यक्ती जेव्हा आवड आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी त्यांचे जीवन धोक्यात घालतात तेव्हा त्यांना मृत्यू आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. व्यवसायाने सीए असलेल्या एका इन्फ्लूएन्सरचा नुकताच दरीत कोसळून मृत्यू झाला. ही इन्फ्लूएन्सर एका दरीजवळ रिल्स बनवत होती. दरम्यान, तिचा दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला.

आणखी एका घटनेत रिल्स बनविण्याच्या नादात एक व्यक्ती आपल्या चारचाकी कारसह दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. रिल्स बनवताना अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नियम आणि कायदे करण्याची आवश्यकता असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे. दरम्यान, अद्याप तरी सरकार पातळीवर त्याचा पुरेसा विचार झाला नाही.