iPhone खरेदी करण्यासाठी चीनी व्यक्तीचा पराक्रम, Kidney विकल्यानंतर आता जगण्यासाठी घेतोय Dialysis चा आधार
iphone (Photo Credits: File Photo)

iPhone खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र जेव्हा जेव्हा आयफोन निर्माती कंपनी अॅपल त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च करतो त्यावेळी सोशल मीडियात तुफान त्या संदर्भातील मेम्स आणि जोक्स व्हायरल होतात. तसेच युजर्सकडून याआधी सुद्धा बोलले गेले आहे की, किडनी विकून आयफोन घेतला पाहिजे. ही जरी फक्त थट्टा असली तरीही एका चीनी व्यक्तीने मात्र ती सत्यात उतरवली आहे. चीन मधील एका व्यक्तीने iPhone4 आणि iPad2 खरेदी करण्याठी 2011 मध्ये आपली किडनी विकली.(मूत्र कुठून येते हे जाणून घेण्यासाठी एका १३ वर्षीय चीनी मुलाने त्याच्या गुप्तांगात घातली 2 फूट धातुची वायर)

Wang Shangkun असे तरुणाचे नाव असून 2011 मध्ये तो 17 वर्षाचा होता. मात्र सध्या त्याला आयुष्य जगण्यासाठी झगडावे लागत असून तो जीवंत राहण्यासाठी Dialysis चा आधार घेत आहे. त्याच्यावर सर्जरी करण्यात आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या किडनीत सुद्धा इन्फेक्शन झाले. त्यामुळे ती सुद्धा निकामी झाली. प्रत्येक महिने जसे जात आहेत तशी त्याची प्रकृती खालावली जात आहे. ऐवढेच नाही तर त्याला बेडवरुन सुद्धा उठता येत नाही अशी स्थिती झाली आहे. Wang Shangkun याच्या रक्तातील Toxins काढण्यासाठी त्याच्यावर नियमितपणे डायलिसीस केले जाते.

ही घटना 9 वर्षांपूर्वीची असून Wang Shangkun याला आयफोनच्या या दोन गोष्टी खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी त्याने अवयव दान केल्यानंतर त्याला 20 युआन मिळाले. तसेच त्याने कायदेशीररित्या किडनी दान केली. त्यावेळी Wang Shangkun याने म्हटले होते की, त्याने एक किडनी विकल्यानंतर त्याला दुसऱ्याच किडनीची फक्त गरज असल्याचे म्हटले होते. रिपोर्टनुसार, या तरुणाने पालकांच्या संमतीशिवाय अवयवदान करण्यासाठी ऑपरेशन केले. हे ऑपरेशन दोन स्थानक रुग्णालयातील वैद्यकिय डॉक्टरांकडून पार पाडले गेले. या प्रकरणी पोलिसांकडून 9 जणांना ताब्यात घेण्यात ही आले होते. यामध्ये ऑपरेशन करणाऱ्या सर्जनचा सुद्धा समावेश आहे.(Cow Snacks on Snake: ऑस्ट्रेलिया मध्ये गाय सापाला खात असल्याची दुर्मिळ घटना कॅमेर्‍यात कैद; पहा व्हायरल फोटो)

Wang Shangkun याच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून $3,00,000 मिळाली होती. त्याच वर्षात त्याने किडनी सुद्धा दान केली होती. Shangkun अशा परिवारातील तरुण आहे ज्याच्या परिवाराला त्याला आयफोन सुद्धा घेऊन देऊ शकत नाहीत. याच कारणास्तव त्याने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. या विचित्र प्रकारामुळे त्याने आपली किडनी गमावत फक्त मित्रांसमोर शो ऑफ करण्यासाठी आयफोन घेतला. पण आता जगण्यासाठी तो झुंजच देत आहे.