Cow eating snake (Photo Credits: Andrew Gertz | Facebook)

ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलॅन्ड या भागामध्ये भलेमोठे साप कुठल्याही चित्र विचित्र ठिकाणी आढळतात. हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. पाहिलं देखील असेल. पण चक्क गाय साप खात असल्याची एक विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे. Sandover Highway वर 300 किमी दूर परिसरात ही घटना एका ड्रायव्हरने टिपली आहे. साप खाणार्‍या गाईचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. क्विन्सलॅंडमध्ये यापूर्वी लहान मुलांच्या बेडरूम मध्ये, टॉयलेट मध्ये साप आढळल्याची घटना समोर आली आहे. Little Girl Swims With Python: पाळलेल्या अजगरासोबत 8 वर्षांच्या मुलीचे स्विमिंग; थक्क करणारा 'हा' व्हायरल व्हिडिओ नक्की पहा.

ABC, च्या रिपोर्टनुसार साप खाणार्‍या गायीचा फोटो Andrew Gertz ने टिपला आहे. त्याने घडलेला प्रकार मीडियाला सांगताना,'मी जवळ पाहिलं तेव्हा गायीच्या तोंडात मला ब्लॅक हेडेड पायथन लटकताना दिसला. ही खूपच विचित्र घटना होती. गाय हा शाकाहारी प्राणी आहे. पण तिच्या तोंडात साप कसा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. Gertz च्या म्हणण्यानुसार, 'कदाचित गाय बाहेर पडली तेव्हा चारा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये तिने त्याला डिवचलं असावं आणि तो साप गायीच्या जीभेवर चावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये अडकला असावा.'

गायीच्या तोंडात साप

गाय herbivores म्हणजेच शाकाहरी असला तरीही तिला चारा ऐवजी मांस खाण्याची क्षमता आहे. प्रसंगी गाय मांस देखील खाऊच शकते. क्विंसटाऊनमधील हा प्रकार तुम्हांला गाय मांस खाऊ शकते याची झलक दाखवणारा दुर्मिळ क्षण आहे. ट्वीटर वर देखील क्विंसटाऊन मधील गाईचे फोटो शेअर केले जात आहेत.