एका वेळी तुम्ही किती बिअर (Beer) पिऊ शकता अशा स्वरूपातील स्पर्धांबद्दल आपण ऐकले असेल. अनेकांनी यात मोठमोठे रेकॉर्ड केले असतील. मात्र अशी स्पर्धा स्वतःशीच लावून चीन मधल्या एका व्यक्तीने स्वतःच्याच जीवाशी खेळ केला आहे. होय, चीन (China) मधील 40 वर्षीय व्यक्तीने काही दिवसांपूर्वी एकावेळी 10 बिअर पिऊन आपली लघवी रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचा परिणाम इतका गंभीर झाला की त्याचे मूत्राशय (Bladder) फुटून त्याला ऑपरेशन करणे भाग पडले होते. या व्यक्तीचे नाव हू (Hu) असे असून तो चीन च्या पूर्वेकडील झेजियांग (Zhejiyang) भागात राहतो. या व्यक्तीने 10 बिअर एकत्र प्यायल्यावर तब्बल 18 तास आपली लघवी रोखून धरली होती, त्यानंतर त्याचे मूत्राशय फुटून त्याला असहनीय वेदना होऊ लागल्या. यानंतर त्याला झूजी पीपल्स हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आणि तिथेच त्याची सर्जरी सुद्धा करण्यात आली. ऐकावं ते नवलंच! चीन मधील व्यक्तीच्या Bum मधून आत शिरला मासा, बाहेर काढण्यासाठी करावी लागली सर्जरी (Watch Video)
प्राप्त माहितीनुसार, हू ला हॉस्पिटल मध्ये नेताच यूरोलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत त्याचे स्कॅनिंग करण्यात आले होते. यात असे दिसून आले की खूप वेळ लघवी रोखून धरल्याने त्याच्या मुत्राशयातील तीन मुख्य बिंदूंवर दबाव आला आणि अखेरीस तणाव सहन न झाल्याने मूत्राशय ब्लास्ट झाला. सुदैवाने आता या ऑपरेशन नंतर हू ची प्रकृती स्थिर आहे.धक्कादायक! हस्तमैथुन करताना तरुणाने लिंगामध्ये घातली फोन चार्जरची वायर; 5 दिवसांनतर शस्त्रक्रियेद्वारे मुक्तता (Video)
लक्षात घ्या, असे प्रकार करणे तुमच्या जीवासाठी बरेच धोकादायक असू शकते, डॉक्टरांच्या माहितीनुसार, मानवी मुत्राशयाची क्षमता 350 ते 500 मिली इतकी असते, त्यावर अधिक तणाव देणे हे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे लघवी रोखून धरण्याचे शक्यतो टाळावेच.