देशातील आसाम (Assam) राज्यातील गुवाहाटी (Guwahati) मधून एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे, ज्याने इथल्या इस्पितळात रुग्णांचे ऑपरेशन करतांना तिथे उपस्थित सर्व डॉक्टरांनाही धक्का दिला. मिळालेल्या वृत्तानुसार, एका चुकीच्या पद्धतीने हेडफोनची केबल गिळल्याची तक्रार घेऊन एक 30 वर्षीय व्यक्ती या रुग्णालयात आला होता. डॉक्टरांनी रुग्णाच्या स्टूलची तपासणी केली, नंतर एंडोस्कोपीही झाल्यावर डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली, मात्र त्यावेळी त्यांना रुग्णाच्या पोटात काहीही आढळले नाही. पुढे त्यांनी या रुग्णाचा एक्स-रे काढला व त्यांना मूत्राशयात (Urinary Bladder) चक्क मोबाइल फोन चार्जरची वायर आढळली.
याबाबत डॉक्टर वॉली इस्लाम (Dr Wallie Islam) यांनी सांगितले की, या तरूणाने प्रत्यक्षात तोंडा वाटे नाही, तर जननेंद्रियातून (Penis) शरीरात मोबाईल चार्जरची केबल घातली होती. याआधी या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले होते की, हेडफोनची सुमारे 2 इंचांची वायर गिळल्याने त्याच्या पोटात दुखणे सुरु झाले आहे. अखेर शस्त्रक्रियेद्वारे ही केबल काढली गेली. इस्लाम यांनी न्यूज 18 ला माहिती देताना सांगितले की, या व्यक्तीला लैंगिक सुख मिळावे म्हणून आपल्या लिंगावाटे काही गोष्टी आत घुसवण्याची सवय होती. मात्र यावेळी त्याचा चार्जरची वायर आत घालण्याचा प्रयोग फसला आणि ती मूत्रमार्गाच्या मूत्राशयापर्यंत पोहोचली.
पहा फेसबुक पोस्ट -
ही घटना घडल्यानंतर तब्बल 5 दिवसांनी या व्यक्तीने डॉक्टरांशी संपर्क साधला होता. इस्लाम यांनी याबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणता, ‘शस्त्रक्रियेबाबतचे आश्चर्य! शस्त्रक्रियेच्या 25 वर्षांच्या अनुभवानंतरही. मी माझ्या बौद्धिक आणि शल्यक्रिया कौशल्यांना आव्हान देत असलेल्या अशा घटनांनी आश्चर्यचकित होत आहे.’ (हेही वाचा: King Cobra ला चक्क हाताने धरून बरणीत भरणाऱ्या महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल, हिंमत बघून व्हाल थक्क (Watch Video)
शेवटी ते म्हणता, ‘या रुग्णाच्या मानसिक आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह आहे, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्ण बरा होत आहे.... या पृथ्वीवर सर्व काही शक्य आहे, खरंच!’