अवघ्या 10 मिनिटांत 1.5 लीटर प्यायला Coca Cola, वाचा 6 तासानंतर नेमके काय घडले
Coca Cola (Photo Credits-Twitter)

तुम्हाला सुद्धा कोल्डड्रिंग पिणे आवडते? जगभरात खासकरुन ब्रिटेनमध्ये लोक दररोज डेली डाएटमध्ये कोल्डड्रिंकचा समावेश केला जातो. काही लोक प्रतिदिनी काही लीटर कोल्डड्रिंक पितात. मात्र नुकत्याच चीन मध्ये कोल्डड्रिंक प्यायले असे काही घडले ते ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. झाले असे की, एका व्यक्तीचा कोल्डड्रिंक प्यायल्याने मृत्यू झाला आहे. असे सांगितले जात आहे की, मुलाने अवघ्या 10 मिनिटांत दीड लीटर कोका कोला प्यायला. यामुळे त्याच्या शरिरात अतिप्रमाणात गॅस निर्माण होत त्याचा मृत्यू झाला.

चीनच्या लोकल मीडियात छापलेल्या बातमीनुसार, येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोल्डड्रिंक प्यायल्याने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला खुप गरम होत असल्याने त्याने चक्क दीड लीटर कोका कोलाची बॉटल खरेदी करत ती प्यायला.(ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मध्ये भुकंप येण्यापूर्वी मांजरीने पहा कशा पद्धतीने मालकाला केले अलर्ट Video)

असे सांगितले जात आहे की, सध्याच्या दिवसात चीनमध्ये भीषण गरमी सुरु आहे. याच कारणामुळे व्यक्तीने दीड लीटर कोका कोला खरेदी केला. मात्र अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढले गेले आणि त्याचा बीपी अगदीच कमी झाला. पोटात खुप दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, पोटात गॅस निर्माण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

क्लिनिक आणि रिसर्च इन हेप्टोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या तज्ञांच्या मते, कोल्ड ड्रिंक्स वारंवार पिल्याने त्याच्या आतड्यांमध्ये गॅस तयार झाला. यासोबतच पोटाच्या नळीतही गॅस शिरला होता. यामुळे त्याचे यकृत ऑक्सिजन पुरवू शकले नाही. ज्यामुळे यकृताला धक्का बसला आणि त्या व्यक्तीने आपला जीव गमावला. त्या व्यक्तीचा अवघ्या 18 तासांत मृत्यू झाला. मात्र, डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्राध्यापक नाथन देविस यांच्या मते, हे शक्य नाही. कोकाकोला दीड लिटर पिऊन कोणाचा मृत्यू होणे शक्य नाही.