मियां साकिब निसार, न्यामूर्ती, पाकिस्तान (Photo Credits : Twitter )

पाकिस्तानी न्यायाधीश काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मागे एकदा पाकिस्तानच्या न्यायालयाने चक्क एका कुत्र्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे तेथील न्यायाधीश चर्चेत आले होते. आता, पुन्हा एकदा आणखी एक न्यायाधीश चर्चेत आले आहेत. या न्यायाधीशांनी तर, पाण्याचा चक्क नवा फॉर्म्यूला सांगितला आहे. विशेष म्हणजे एका जाहीर भाषणात या न्यायाधीश महोदयांनी फॉर्म्युला सांगितला आहे. पाण्याबद्दलचे त्यांचे अजब ज्ञान पाहून उपस्थित तर एकदम अवाकच झाले. सोशल मीडियावर तर त्यांच्या फॉर्म्युल्याची भलतीच चर्चा सुरु झाली आहे. या महोदयांच्या भाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या या न्यायाधीश महोदयांचे नाव आहे मियां साकिब निसार. ते पाणीटंचाई आणि पाण्याची समस्या या विषयावर तडाखेबंद भाषण ठोकत होते. दरम्यान, भाषणाच्या ओघात त्यांना पाण्याचा फॉर्म्युला सांगण्याचा मोह आवरला नाही. ते म्हणाले, पाण्याचे एकूण ४ सोर्स असतात. त्यातील एकही सोर्स आमच्याकडे नाही. ज्यामुळे आम्ही पाण्याची निर्मिती करु शकू. निसार साहेबांनी सागितले की, H2Zero हा पाण्याचा एक फॉर्म्युला तर आहे आपल्याकडे. निसार साहेबांकडे असलेला पाण्याचा हा फॉर्म्युला ऐकून अनेकांच्या तोंडचे पाणी तर पळालेच. पण, ट्विटरवरुन हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. (हेही वाचा, घोड्याला नाही आवडला महिलेचा अचरट डान्स; दिली शिक्षा, घडली जन्माची अद्दल (व्हिडिओ)

खरे तर, वैज्ञानिक भाषेत पाण्याचा फॉर्म्युला H2O (एच टू ओ) असा सांगितला जातो. पण, एच टू ओ असतं हे निसार साहेबांच्या ध्यानातच राहिलं नसावं बहुदा. त्यामुळे त्यांनी थेट पाण्याचा फॉर्म्युलाच बदलून टाकला. एचटूओ (H2O) ऐवजी त्यांनी तो एच टू झिरो (H2Zero) असा करुन टाकला. न्यायमूर्ती निसार साहेब पाण्याचा नवा फॉर्म्युला सागत असलेला व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. जो आता भलताच व्हायरल झाला आहे.