रागावलेल्या बायकोची समजूत काढण्यासाठी नवऱ्याने लढवली हटके शक्कल, 'असा' टॅटू काढून मागितली माफी
जॉस टोरेस (फोटो सौजन्य- ट्वीटर)

नवरा- बायोकोच्या नात्यात गैरसमज झाल्यास त्यांच्यातील नात्यात फूट पडण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत दोघांमधील एका व्यक्तीला समजवणे ही कठीण होऊन बसते. अशा पद्धतीची एक घटना लंडन मधील विविहीत दापंत्याच्या नात्यामध्ये झाली आहे. त्यामुळे बायकोची समजूत काढण्यासाठी नवऱ्याने भन्नाट शक्कल लढवली आहे. तर दोघांमधील वाद संपवण्यासाठी नवऱ्याने चक्क टॅटू काढून बायकोची माफी मागितली आहे.

जॉस टेरेस असे या तरुणाचे नाव आहे. जॉसने त्याच्या बायकोला विवाहीत जीवनात फसवले होते.त्यामुळे जॉसला झालेल्या पश्चातापाची माफी मागण्यासाठी त्याने पोटावर एक टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये जॉसने असे म्हटले आहे की, 'मी जॉस टेरेस 2 जानेवारी 2019 रोजी हा टॅटू स्वत:च्या मर्जीने काढला आहे. मला माझ्या बायोकाला पुन्हा आयुष्यात आणायचे आहे. तर माझ्यामुळे बायकोला झालेला त्रास आणि छळाची माफी मागत आहे'.

या टॅटूमध्ये जॉसने पुढे असे लिहिले आहे की, मी खोटारडा, गुन्हेगार, चालाख अशा शब्द बायकोची माफी मागण्यासाठी त्यामध्ये लिहीले आहेत. जॉसने काढलेला हा टॅटू सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून संमिश्र पद्धतीच्या प्रतिक्रिया जॉसला देण्यात येत आहे.