तुम्ही रंगांची होळी, टोमॅटो मार होळी, कपडा फाड होळी इ. बद्दल ऐकले असेल, परंतु कधी चप्पल मार होळीचे (Chappal Maar Holi) नाव ऐकले आहे? नसल्यास, आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. बिहारची (Bihar) राजधानी पाटणा येथे एका वेगळ्या प्रकारची होळी म्हणजेच चप्पल मार होळी खेळली गेली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, वॉटर पार्कमध्ये होळी खेळण्यासाठी आलेले अनेक तरुण एकमेकांवर चप्पल फेकत आहेत. संपूर्ण वॉटर पार्क रंगांच्या पाण्यासह चप्पलने भरलेला दिसला.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, होळीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले तरुण रंग लावण्याऐवजी एकमेकांवर चप्पल फेकताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पटनामधील संपतचतकच्या वॉटर पार्कमधील आहे. या ठिकाणी होळीसाठी एका खास कार्यक्रमाची तयारी केली गेली होती. ज्यासाठी संपूर्ण वॉटर पार्क सजवण्यात आला होता. या वॉटर पार्कमध्ये अनेक तरुण होळी खेळण्यासाठी जमले होते. (हेही वाचा: ITBP चे 'हिमवीरांचा' हिमाचल प्रदेशातील उंच हिमालयात बर्फात कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, Watch Video)
#WATCH पटना : वाटर पार्क में होली के जश्न के दौरान लोग एक-दूसरे पर चप्पल फेंकते दिखे। pic.twitter.com/eFAY65wsU7
— ANI_HindiNews (@AHindinews) March 17, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या तरुणांपैकी काही मित्रांनी तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या मित्रांवर चप्पल फेकण्यास सुरुवात केली. काही वेळातच दोन्ही बाजूंनी लोक एकमेकांवर चप्पल फेकू लागले. कोणीही थांबायला तयार नव्हते आणि हळूहळू वॉटर पार्कमधील सर्व तरुण एकमेकांवर चप्पल फेकायला लागले. सगळीकडे चप्पलांचा पाऊस पडत होता. व्हिडीओ पाहून या ठिकाणी जणू काही चपलांनी होळी साजरी होत असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, मथुरेतील संख भागातील बछगांवमध्ये चप्पल मार होळीची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. धुलेंडीच्या दिवशी गावातील वडीलधारी मंडळी एकमेकांशी गुलालाने होळी खेळतात. यानंतर अकरा वाजल्यापासून गावातील लोक एकमेकांना चप्पल मारून होळी खेळण्यास सुरुवात करतात. येथे चप्पल मारण्यावरून कोणताही वाद झालेला नाही. ही परंपरा हजारो वर्ष जुनी असल्याचे गावातील लोक सांगतात.