Fake Time Table| Photo Credits: Twitter/ PIB Fact Check

कोरोना वायरस लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियात खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. यामध्ये आता सीबीएससी परीक्षांचे वेळापत्रकाचाही समावेश झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी काही दिवसांपूर्वी आगामी वर्षी होणार्‍या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर काहींनी संपूर्ण वेळापत्रक व्हायरल केलं. पण ते वेळापत्रक खोटं असल्याची माहिती पीआयबी ने सांगितलं आहे. पीआयबी ही सरकारी एजंसी असून त्यांच्याकडून वेळोवेळी अशा खोट्या बातम्यांबाबत खुलासा दिला जातो. CBSE Board Exam Dates 2021: सीबीएसईच्या 10 वी, 12 वी परीक्षांच्या तारखा जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करत केलेल्य खुलाशानुसार, डेटशीट खोटी आहे. गुरूवार, 31 डिसेंबर दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळेस केवळ 10वी,12वी च्या परीक्षा 4 मे पासून 10 जून पर्यंत घेतल्या जातील आणि 10 वी 12वीचे निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केले जातील असे सांगितले आहे.

PIB Tweet

सीबीएसई बोर्ड्सच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करताना त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना कोविड 19 चा सामना करत तयारी करावी लागत आहे याचं आम्हांला भान आहे. पण या अनिश्चिततेचा तुमच्या अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होऊ देऊ नका. नवनव्या पद्धतींचा सध्या आधार घेऊन डिजिटल माध्यमातून अभ्यासासाठी साहित्य पुरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.