Representational Image. (Photo Credits: PTI)

CBSE Board Exam Dates 2021:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) च्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा 2021 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सीबीएसईच्या बोर्ड परीक्षांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी अधिक माहिती दिली आहे. बोर्ड परीक्षांच्या तारखांबद्दल माहिती देण्यासाठी रमेख पोखरियाल यांनी ट्विटरवर लाईव्ह आले होते. तर CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा 2021 डेटशीट बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर केली जाणार आहे.(A Special English Hour: इ. 1 ली ते इ. 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी DD Sahyadri वर इंग्रजी विषयासाठी खास कार्यक्रम; जाणून घ्या वेळ)

रमेख पोखरियाल यांनी 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांबद्दल माहिती देत असे म्हटले आहे की,येत्या 4 मे 2021 पासून परीक्षा सुरु होणार असून 10 जून 2021 पर्यंत संपणार आहेत. या परीक्षांचे निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केले जातील असे ही पोखरियाल यांनी जाहीर केले आहे.(JEE (Mains) 2021 Exams Date: जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी ते मे दरम्यान होणार, पहिल्या सत्राचे पेपर 23 ते 26 मध्ये आयोजित- रमेश पोखरियाल निशंक)

>>Date Sheet 2021 डाऊनलोड करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा

-बोर्ड परीक्षेची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जा.

-येथील Homepage वर Recent Announcements च्या सेक्शन मध्ये जा.

-तेथे तुम्हाला डेटशीट जाहीर झाल्यानंतर Recent Announcements सेक्शन एक्सेस करता येणार आहे.

-यानंतर विद्यार्थ्याला आपल्या सुविधेनुसार सीबीएसई डेटशीट किंवा प्रिंटआउट डाऊनलोड करता येणार आहे.

याआधी रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले होते की, 10 वी आणि 12 वी सीबीएसई बोर्ड परीक्षा फक्त लेखी स्वरुपात घेतली जाईल. तर शनिवारी त्यांनी 31 डिसेंबरला बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते.