Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका समुद्रातील Manatee प्रजातीच्या पाठीवर ट्रंम्प यांचे नाव लिहिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्याने अमेरिकेतील फिश अॅन्ड वाइल्डलाइफ सर्विसने या प्रकरणी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील वाइल्डलाइफ प्रोटेक्शन कायद्याअंतर्गत Manatee ही दुर्मिळ प्रजाती आहे. सिट्रस काउंटी क्रॉनिकल यांनी या प्रकरणी एक व्हिडिओ सुद्धा जाहीर केला आहे. यामध्ये Manatee स्लो मोशन मध्ये फिरताना दिसून येत आहे.

व्हिडिओत डोनाल्ड ट्रंम्प यांचे नाव Manatee च्या पाठीवर लिहिल्याने तपास तर सुरु केला आहे. पण ते कोणी लिहिले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सोशल मीडियात याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.(Viral Video: जापान च्या प्राणिसंग्रहालयात ख-याखु-या वाघांसमोर खोटा वाघ बनून फिरताना दिसला एक व्यक्ती, पाहा पुढे काय झाले)

Tweet:

या प्रकरणी अॅरिझोना बेस्ड सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी यांनी असे म्हटले की, या प्रकरणी अधिक माहिती देणाऱ्याला 5 हजार डॉलर्स म्हणजेच 3 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. हे समुद्री जीव शाकाहरी असून आपल्या विशालकाय शरीर आणि शांत स्वभावामुळे त्यांना समुद्रातील गाय असे ही म्हटले आहे.

अमेरिकेतील फिश अॅन्ड वाइल्डलाइफ सर्विसचे प्रवक्ता यांनी असे म्हटले आहे की, या प्रकरणी समुद्री जीवाला कोणतीही दुखापत झालेली नाही. अमेरिकेचे सरकार या प्रजातीच्या संरक्षणासाठी अत्यंत अॅक्टिव्ह आहे. गेल्या वर्षात या प्रजातीमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर 1991 मध्ये फ्लोरिडा मध्ये या प्रजातींची संख्या 1267 होती जी आता वाढून 6300 झाली आहे.

दरम्यान प्रथमच डोनाल्ड ट्रंम्प यांच्या बद्दल अशा प्रकारची घटना घडली आहे. याआधी सुद्धा नॉर्थ कॅरोलिन मध्ये ट्रंम्प 2020 नावाचा स्टिकर अस्वलाच्या शरिरावर लावण्यात आला होता. ही घटना समोर आल्यानंतर पर्यावरण विशेषज्ञांनी या घटनेबद्दल राग व्यक्त केला होता.