Candle Vada Pav | (Photo Credits: instagram)

Mumbai Street Food and Candle Art: वडापाव (Vada Pav) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कधी एकदा तो खातो असे होऊन जाते. त्यात सोशल मीडियावर (Social Media) कोणी एखादी रेसीपी शेअर केली किंवा एखादा बनवलेला छान पदार्थ दाखवला तरीसुद्धा ही भावना वाढीस लागते. अशाच एका वडापावने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण गंमत अशी की, हा वडापाव तुम्हाला खाता येणार नाही. फार फार तर तुम्ही तो पाहू शकता आणि पेटवू शकता. आश्चर्य वाटले ना? पण त्यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. तुम्ही हा वडापाव फक्त पेटवूच शकता. का, असा प्रश्न विचारता? मग घ्या जाणवून.

मेणबत्ती कला ही एक अनेक सर्जनशिल लोकांपैकी काही लोकांनाच जमणारी बाब. अलिकडे मेणबत्ती कला सादर करणारे अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. असाच एक कलाकार युजर्सचे लक्ष वेधून घेतो आहे. आणि हो, हे लक्ष वेधून घेण्यासाठी कारण ठरला आहे 'मेणबत्ती वडापाव'. होय, मेणबत्ती कला सादर करताना निर्मिती केलेला हा वडापाव अगदी हुबेहुब वडापावसारखाच दिसतो. कोणताही व्यक्ती अगदी नजरेने पाहूनच सांगेल की, तो वडापाव आहे म्हणून. जर कोणाला हातात दिला तर कदाचीत तो ते खातील सुद्धा. पण, गंमत अशी की हा मेणापासून बनवला असल्याने खाता येणार नाही. पण त्याच्या वास्तववादामुळे हा वडापाव अगदीच खराखुरा वाटतो आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुक होऊ लागले आहे. (हेही वाचा, Worst Indian Street Food: खराब स्ट्रीट फूड यादीत Dahi Puri अव्वल)

Candle Vada Pav
Candle Vada Pav | (Photo Credits: instagram)

'हाऊस ऑफ ड्रिप' या इन्स्टाग्राम पेजवर या वडापावचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून या रीलने 779K दृश्ये मिळवली आहेत. ज्यावर वापरकर्त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी काही कालीलप्रमाणे.

- "क्रिएटिव्ह पण प्रत्येक वेळी जेव्हा मी ते पाहतो तेव्हा मला भूक लागते."

- "वडा पाव प्रेमी म्हणून मी तुमच्या कामाचे कौतुक करतो."

- "हे वडापावसारखे दिसते, पण ते खाता येत नाही"

- "ते सुंदर दिसते आहे पण चवदार आणि सुरक्षित आहे का?"

- "हे खूप नाविन्यपूर्ण आहे."

व्हिडिओत पाहायला मिळते की, एक कलाकार बारकाईने देसी सँडविच (वडापाव) सारखी मेणबत्ती तयार करतो. मेणाचे ठोके वापरून, कलाकार कुशलतेने मेणबत्तीला वडापावच्या विशिष्ट आकारात तयार करतात. नंतर क्लिष्ट तपशील जोडले जातात, मध्यवर्ती भाग पिवळसर-केशरी रंगात रंगवलेला बटाटा वडाचे अनुकरण करण्यासाठी त्याला थोडासा रंगही दिला जातो. मेणबत्तीचा गाभा म्हणून काम करण्यासाठी एक लांब वातही त्याला जोडली आहे. तर वरच्या पृष्ठभागावर ताज्या पाव ब्रेडची आठवण करून देणारा सोनेरी तपकिरी वर्कही सुशोभित केला गेला आहे. सोबतच हिरव्या रंगात चटणीही उपलब्ध आहे. (हेही वाचा, Mumbai's Street Food Vada Pav: मुंबईचे स्ट्रीट फूड वडापाव जगातील 13 व्या क्रमांकाचे सर्वोच्च सँडविच)

व्हिडिओ

दरम्यान, कलात्मकता एवढ्यावरच थांबत नाही. कोरडी लसूण चटणी सोबत एक उत्कृष्ट वडा पाव मसाला तयार करण्यासाठी कलाकार क्लिष्टपणे केशरी मेणाचे तुकडे कापतो आणि त्यात समाविष्ट करतो. शेवटचा वडापावचा उत्कृष्ट नमुना वर्तमानपत्राच्या शीटवर ठेवलेल्या दोन मेणबत्त्या म्हणून सादर केला जातो त्यापैकी एक पेटवला जातो.