Viral Video: हवेत पुशअप्स मारत पठ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, बघा व्हिडीओ

इथे अनेकांना जमिनीवर पुशअप्स मारणं अवघड आहे पण या पठ्याने चक्क हवेत पुशअप्स मारत विश्वविक्रम (World Record) आपल्या नावी नोंदवल आहे. तरुणांमध्ये  कसरत (Exercise) करत बॉडी मेंटेन (Body Maintain) करण्याचा सध्या मोठ्या छंद दिसून येतो. जीम (Gym), डाऐट (Diet), प्रोटीन (Proteins), कसरत, एक्सरसाईझ या सगळ्या तरुणांच्या आवडीच्या बाबींपैकी एक आहे. त्यापैकी पुशअप्स ही सगळ्यात प्रसिध्द किंवा रोजच्या व्यायामात असलेला महत्वाचा भाग. जो कुणी जास्तीत जास्त पुशअप्स मारु शकला त्याचा स्टामीना (Stamina) अधिक अशी तरुणांमध्ये समज आहे. म्हणून बरेच वेळी तरुण मंडळी आपल्या सोशल मिडीया पेजवर आपल्या पुशअप्सचा व्हिडीओ शेअर (Share) करताना दिसता. पण आता आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ (Video) दाखवणार आहोत तो तरुण 1 मिनिटांत तब्बल 25 पुशअप्स मारतो ते देखील हवेत.

 

सोशल मिडीयावर (Social Media) हवेत पुशअप्स (Push Ups) मारणाऱ्या तरुणाच्या व्हिडीओची (Video) सध्या जोरदार चर्चा होत आहे.  हवेत पुशअप्स मारणाऱ्या या तरुणाचं नावं स्टॅन ब्राउनी (Stan Bruininck) असुन त्याने हेलिकॉप्टरला (Helicopter) लटकून 1 मिनिटांत तब्बल 25 पुशअप्स मारल्या आहेत. यासाठी स्टॅन ब्राउनी या तरुणाच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of World Record) करण्यात आलेली आहे. तरी विश्वविक्रम करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या अधिकृत यूट्यूब (YouTube) पेजवर शेअर (Share) करण्यात आला आहे आणि संबंधीत कामगिरी बाबत त्याचे कौतुक देखील करण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Viral: नेमकी ही कुठली फॅशन? 42 फूट नखं वाढवतं महिलेचा विश्व विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद)

पूर्वी रोमन सह्रादियन (Roman Sahradyan) याच्या नावे हेलिकॉप्टरला लटकत एका मिनिटात 23 पुल-अप्स करण्याचा रेकॉर्ड (Record) होता. आता अल्बर्स (Albers) आणि स्टॅन ब्राउनी या दोघांनीही रोमन सह्रादियन याचा हेलिकॉप्टरला लटकत एका मिनिटात सर्वाधिक पुल-अप्स करण्याचा विक्रम मोडला आहे. अल्बर्स याने आधी हेलिकॉप्टरला लटकत एका मिनिटात 24 पुल-अप्स केल्यात त्याच्यानंतर स्टॅन ब्राउनी (Stan Bruininck) याने एका मिनिटात 25 पुल-अप्स करत रोमन आणि अल्बर्स यांचा विक्रम मोडत हेलिकॉप्टरला लटकत हवेत सर्वाधिक पुशअप्स करण्याचा विश्वक्रम आपल्या नावी नोंदवला आहे.