साओ पाउलो फॅशन वीक (Sao Paulo Fashion Week) मध्ये रॅम्प वॉक करताना ब्राझील येथील प्रसिद्ध मॉडेल टेल्स सोअर्स (Tales Soares) याचा मृत्यू झाला. रॅम्प वॉक करताना ब्रॉझिलियन मॉडेलने आपल्या सँडलचे स्ट्रप ओपन केले. तेव्हाच बेशुद्ध झालेल्या या मॉडेलचा जागीच मृत्यू झाला. हाती आलेल्या वृत्तानुसार टेल्स सोअर्स याची तब्बेत आधीपासूनच बिघडलेली असून रॅम्प वॉक करताना त्याचे पाय लटपटत होते. त्यामुळे अचानक तो कोसळला आणि त्याचा जागीत मृत्यू झाला. त्याच्या तोंडातून फेस आला. उपस्थित मेडिकल टीमने टेल्सला शुद्धीवर आणण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र प्रयत्नांना यश येत नसल्याने त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
टेल्स एमजीटी नावाच्या मॉडलिंग एजेंसीसाठी काम करत होता. टेल्सच्या मृत्यूला त्याची ड्रग्स घेण्याची सवय कारणीभूत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र एमजीटी कंपनीने या वृत्ताचे खंडन केले आहे. तसंच टेल्स यांनी यापूर्वी अनेक शोज केले असून त्याची वर्तवणूकही चांगली असल्याचे बोलले जात आहे.
El modelo Tales Soares se desvaneció durante la pasarela de #OCKSA en la #SPFW, falleció mientras era atendido en el hospital al que fue trasladado, en #SaoPaulo, #Brasil pic.twitter.com/9fsx31d0Jv
— David de la Paz (@daviddelapaz) April 28, 2019
View this post on Instagram
https://metro.co.uk/video/the-moment-brazilian-model-tales-soares-collapses-1914558/?ito=vjs-link
पहा व्हिडिओ:
एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार, टेल्स शुद्ध शाकाहारी असून नेहमीच संतुलित आहार घेत असे. हेल्दी म्हणून पाहिल्या जात असलेल्या टेल्सचा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक ठरला. अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून रिपोर्टची सर्वजण वाट पाहत आहेत.