Anand Mahindra यांच्याकडून सांगलीतील Jugaad Mini Ford निर्मात्यास Bolero भेट; दत्तात्रय लोहार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
Anand Mahindra | (Photo Credit - Twitter)

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सांगली (Sangli) येथील दत्तात्रय लोहार (Dattatraya Lohar) यांना बोलेरो गाडी भेट देत दिलेला शब्द पाळला आहे. शिवाय लोहार यांच्या पाठीवर कृतीतून कौतुकाची थापही दिली आहे. सांगली येथील दत्तात्रय लोहार यांनी स्वत: तयार केलेल्या जुगाड मिनी फोर्ड (Jugaad Mini Ford) या जीपची चांगलीच चर्चा परिसरात रंगली होती. काही लोकांनी या गाडीचे ' जुगाडू मिनी जीप' असेही नामकरण केले होते. या गाडीची चक्क महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही दखल घेतली होती. लोहार यांच्या कल्पनाशक्ती आणि निर्मितीला दाद देत ही गाडी घेऊन त्या ऐवजी बोलेरो गाडी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

सांगली येथील एका महिंद्रा शोरुममधून दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा बोलेरो सुपूर्त केल्याची कॅप्शन देत काही फोटो आनंद महिंद्रा यांना ट्विटरवर टॅग करण्यात आले आहेत. (हेही वाचा, सांगलीच्या जुगाड मिनी जीप बनवणार्‍याच्या कल्पकतेला Anand Mahindra कडून कौतुकाची थाप; पण नियमात न बसणार्‍या या गाडीला मागवत Bolero भेट देण्याची घोषणा)

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात दत्तात्रय लोहार (Dattatray Lohar) यांनी दुचाकीचे इंजीन जोडून एक वेगळी जीप तयार केली होती. आर्थिक परिस्थितीती बेताची असल्याने मोठी गाडी घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:च घरच्या घरी एक जीप बनवली. चार जण बसू शकतील अशा या जीपची परिसरात जोरदार चर्चा होती. सोशल मीडियातही अनेकांनी या जीपचे कौतुक केले होते. दत्तात्रय लोहार हे याच आपल्या स्वनिर्मीतीच्या वाहनातून परिसरात कुटुंबासह फिरायचे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दत्तात्रय लोहार यांच्या देसी जुगाड जीपचा व्हिडिओ शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली होती.त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि ‘किमान’ क्षमतेचे कौतुक करणे मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यकारक आहे,’ अशा कॅप्शनहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केला होता.