सांगलीच्या जुगाड मिनी जीप बनवणार्‍याच्या कल्पकतेला Anand Mahindra कडून कौतुकाची थाप; पण नियमात न बसणार्‍या या गाडीला मागवत Bolero भेट देण्याची घोषणा
आनंद महिंद्रा । PC: Wikimedia Commons/ Twitter

सांगली (Sangli)  मध्ये जुगाड करून एका व्यक्तीने चक्क मिनी जीप (Mini Jeep)  बनवली आहे. दुचाकीचं इंजिन, चारचाकी गाडीचं बोनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करुन किक स्टार्ट जिप एका व्यक्तीने तयार केली आहे. सोशल मीडीयामध्ये त्याची तुफान चर्चा देखील रंगली होती. दरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ही जीप तयार करणार्‍या व्यक्तीची दखल घेतली आहे. आरटीओ नियमांनुसार या व्यक्तीची गाडी रस्त्यांवर धावू शकत नाही पण कल्पकतेला आणि प्रयत्नांना दाद देतो असं म्हणत त्यांनी मिनी जीप मागवून त्याच्या बदल्यात Bolero देतो असं त्यांनी ट्वीट केले आहे.

जुगाड मिनी जीप बनवणार्‍याचं नाव दत्तात्रय लोहार (Dattatray Lohar) असं आहे. सांगलीतील देवराष्ट्रे इथे त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने नवी कार घेणं त्यांना शक्य नव्हते पण त्यांनी अवघ्या 60 हजारांमध्ये जुगाड जीप बनवली आहे. नॅनो पेक्षा लहान असणार्‍या या कार मध्ये 4 जण बसू शकतात. सोशल मीडीयात त्यांच्या या कल्पक निर्मितीची चर्चा आहे. नक्की वाचा: Desi Jugaad: रस्त्यावर धावली बिन घोड्यांची बग्गी, देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा शेअर केला व्हिडिओ .

Anand Mahindra ट्वीट

आनंद महिद्रांनी कौतुकाची थाप देताना स्थानिक प्रशासन ही जीप रस्त्यावर धावू देणार नाहीत कारण ते नियमांत बसत नाही पण ही जीप आम्ही Mahindra Research Valley मध्ये ठेवून एक प्रेरणा म्हणून आम्हांला त्याच्याकडे बघायला आवडेल असं सांगत त्याला महिंद्रांनी बलेरो गाडी त्याच्याबदल्यामध्ये ऑफर केली आहे.

जुगाड मिनी जीपच्या वायरल व्हिडीओला आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर 14 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 1300 रिट्विट्स आहेत आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  स्मार्ट इनोव्हेशनला अनेकदा आनंद महिंद्रा यांनी कौतुकाची थाप दिली आहे.